Medicine : औषधांच्या गोळ्यांवरची लालपट्टी Ignore करताय? सावधान

तुम्हाला महितीय डॉक्टरांच्या सल्याशिवाय घेतलेले औषधं किती धोकादायक ठरु शकतात? परंतु लोक या गोष्टींबाबत फारसे गंभीर नाहीत.
Medicine
Medicineesakal
Updated on

Red Line On Medicine : बऱ्याचदा असं होतं की आपण आजारी पडलो की आपल्याला माहित असलेली औषधं आपण घेतो आणि डॉक्टरकडे जाणं टाळतो. तसेच आपण सरास आपल्या जवळच्या मेडीकलमध्ये जातो आणि तेथून आपल्याला माहित असलेली औषधं घेतो. परंतू तुम्हाला महितीय डॉक्टरांच्या सल्याशिवाय घेतलेले औषधं किती धोकादायक ठरु शकतात? परंतु लोक या गोष्टींबाबत फारसे गंभीर नाहीत.

Medicine
Medicine : औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती

बहुतेकदा आपण औषधाच्या गोळ्यांचं स्ट्रीप आणतो आणि फार तर त्यावरची एक्सपायरी आणि किंमत बघतो. बाकी काणतीही माहिती न वाचता लक्ष न देता त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहितीये का की आणखी एक अशी गोष्ट आहे जी खाण्यापूर्वी तपासणे खूप महत्वाचे आहे.

Medicine
Medicine Price Hike : पेट्रोल-डिझेलनंतर आता औषधंही महागणार

गोळ्यांच्या पाकीटावरची लाल रंगाची रेष / पट्टी याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. आपण बऱ्याच पॅकिटांवर ही लाल रेष पाहिली असेल, परंतू ही लाल रेष कशासाठी असते याबद्दल फारच कमी लोकांना ठावूक असेल.

Medicine
Health Care: 'या' सात सवयी बनवतील तुम्हाला डायबिटीज पेशंट

अनेकांना ही लाल रेष पाहून वाटतं की ते अगदी सामान्य आहे किंवा कंपनीची डिझाइन असावी. परंतू तसं नाही. प्रत्यक्षात, त्या ओळीत खूप महत्वाचे कार्य आहे, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. एक्सपायरी डेटप्रमाणेच हा बार तुम्हाला औषधाविषयीच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगतो.

लाल पट्टी काय दर्शवते?

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने 2016 मध्ये ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी लाल पट्टीचा अर्थ काय आहे हे तपशीलवार सांगितले होते.

Medicine
Mental Health Care : नववर्षात करूया मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प

ज्या औषधांच्या पॅकेटवर लाल पट्टी असते ती डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेऊ नयेत. या औषधांमध्ये एंटिबायोटिक्स आहेत. ज्यामुळे त्या केव्हाही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

Medicine
Health: स्तनाचा आकार सातत्याने वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या..असू शकतो 'हा' गंभीर आजार

अनेक वेळा आपण दुकानदाराकडूनच औषध मागवतो. अशा परिस्थितीत, तुम्ही त्यावरील पट्टी पाहून ते औषध कसे खावे हे तपासू शकता.

मात्र, स्वत: किंवा दुकानदाराच्या सांगण्यावरून कोणतेही औषध घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हा ही चांगलं आहे, तसेच या लाल रेषाच्या गोळ्यांसाठी तर ते आवश्यकच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com