Melatonin: शांत झोपेचे रहस्य! शरीरातील मेलाटोनिन हार्मोन नक्की काय काम करते ?

Sleep Fast with Melatonin?: रात्री झोप न येण्याच्या समस्येवर 'मेलाटोनिन' ठरतेय गुणकारी; वापराबाबत डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला...
Melatonin: Natural Sleep Solution

Melatonin: Natural Sleep Solution

esakal 

Updated on

Sleepless Nights? How Melatonin Helps: शांत आणि सुखाची झोप मिळवण्यासाठी मानवी शरीरात मेलाटोनिन (Melatonin) नावाचे संप्रेरक (Hormone) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. हे संप्रेरक शरीराचे जैविक घड्याळ म्हणजेच सर्कॅडियन लय (Circadian Rhythm) नियंत्रित करण्याचे काम करते.

मेलाटोनिन कसे कार्य करते ?

मेलाटोनिन हे थेट औषधासारखी सक्तीची झोप आणत नाही, तर ते मेंदूला "आता विश्रांतीची वेळ झाली आहे" असा संदेश देते.

  • नैसर्गिक निर्मिती: अंधार पडल्यानंतर शरीरात मेलाटोनिनचे प्रमाण वाढते, तर प्रकाशात ते कमी होते.

  • इतर कार्ये: झोपेशिवाय मेलाटोनिन रक्ताभिसरण (रक्तदाब), रक्तातील साखर (ब्लड ग्लुकोज), शरीराचे तापमान आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

मोबाईल किंवा लॅपटॉपचा निळा प्रकाश, मद्यपान, धुम्रपान, कॅफिनचे सेवन आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केल्याने शरीरातील मेलाटोनिनची पातळी खालावू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com