Monsoon Health Tips : पावसाळ्यात सारखंच घरात कोणी ना कोणी आजारी पडतंय? या गोष्टींचा आहारात नक्की करा समावेश

Ayurved Health Tips : पावसाळ्यात हेल्दी राहण्यासाठी आयुर्वेद उत्तम उपाय ठरतो.
Monsoon Health
Monsoon Healthesakal

Monsoon Ayurvedic Diet Health Tips In Marathi : पावसाळा सुरू झाला की, पावसाचा आनंद घेण्यापेक्षा आजारपणानेच जास्त हैराण व्हायला होतं. आता पाऊस चांगलाच सुरू झाला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, डेंग्यु, चिकनगुनिया, मलेरीयासारख्या आजारांचे रुग्ण घरोघरी बघायला मिळत आहेत. याशिवाय त्वचा आणि केसांच्या समस्याही वाढतात.

पण यासगळ्यावर इलाज म्हणून काही पदार्थांचा आहारात समावेश केला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढून सगळ्याच आजारांवर मात करू शकतात. ते पदार्थ कोणते जाणून घेऊया.

Monsoon Health
Monsoon Healthesakal

आले

आल्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियन, फॉस्फरस, लोह, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे पावसाळ्यात आल्याचा चहा, काढा किंवा जेवणातही आल्याचा वापर करणे उपयुक्त ठरते.

अश्वगंधा

अश्वगंधाला विथानिया सोम्निफेरा नावानेही ओळखलं जातं. यात रोगप्रतिकारक मॉड्युलेटींग गुण आहेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पावसाळ्याच्या आहारात अश्वगंधा अवश्य समाविष्ट करा. ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती मन शांत करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रीत करण्यास मदत करते.

Monsoon Health
Monsoon Healthesakal

कडुलिंब

कडुलिंबाची चव कडू असली तरी त्यात सूक्ष्मजीव गुणधर्म आढळतात. जे पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये बुरशीनाशक गुणधर्म असतात. कडुलिंबाच्या पानांचा चहा, किंवा पाने नुसते चावून खावू शकतात.

गवती चहा

गवती चहात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. आपण ते चहाच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्यामुळे तुमची प्रतिकारकशक्ती वाढते. गवती चहा पावसाळ्यात होण्याऱ्या सामान्य आजारांपासूम संरक्षण करण्यास मदत करू शकते.

गुळवेल

गुळवेलला अमृत वेल म्हणतात. याला हिंदीत गिलोयदेखील म्हटले जाते. या वनस्पतीचे सत्व औषध म्हणून वापरतात. जर तुम्हाला संसर्ग टाळायचा असेल तर तुम्ही गुळवेलचा रस पिऊ शकतात, त्याची पावडर वापरू शकतात. हे संसर्गाशी लढण्यास मदत करते. या आयुर्वेदिक औषधांमध्ये ताप कमी करणारे गुणधर्म आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com