
Mukta Tilak Demise : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्याकाही महिन्यांपासून त्या स्तनांच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
आज आपण स्तनाच्या कर्करोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार याबद्दल जाणून घेणार आहोत. जेव्हा शरीरात पेशींचे अनियंत्रित विभाजन होते, तेव्हा या पेशी एका जागी एकत्रित होतात आणि एक गाठ तयार होते. ज्या भागात अशा प्रकारची गाठ तयार होते ते फुगवटा दिसून येतो. सुरुवातीलाच याकडे लक्ष देऊन तपासणी केल्यास वेळीच उपचार करून यावर उपचार करणे शक्य आहे.
स्तनाच्या कर्करोगाची मुख्य कारणं
स्तनाचा कर्करोग हा बहुधा अनुवांशिक कारणांमुळे होतो, परंतु इतर अनेक कारणांमुळे स्तनांचा कर्करोग होऊ शकतो. धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, हार्मोनल थेरपीमध्ये दिलेली औषधे, वाढत्या वयातील गर्भधारणा. अनियमित जीवनशैली, गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घकाळ वापर आदी कारणांमुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका संभवू शकतो.
प्रमुख लक्षणं
स्तनाच्या आकारात बदल
स्तनाग्र आकार किंवा त्वचेत बदल
स्तनावर पुरळ किंवा खाज सुटणे
स्तन दुखणे
उपचार शक्य
स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर अजिबात घाबरून जाऊ नका, तर, शक्य तितक्या लवकर वैद्यकीय सल्ला घ्या. पहिल्या टप्प्यातील आवश्यक चाचण्यांनंतर या आजारावर उपचार सुरू केल्यास हा आजार बरा होऊ शकतो.
अशी घ्या काळजी
वयाच्या 40 नंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी चाचणी करा
आठवड्यातून किमान पाच दिवस ३० मिनिटे योगा आणि व्यायाम करा.
आहारात अधिक हंगामी फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
प्रोसेस्ड फूड खाणे टाळा
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
शरीरावरील चरबी वाढल्याने इस्ट्रोजेन हार्मोन वाढतो. ज्यामुळे स्तनाचा कर्करोग होतो, त्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त वजन कमी करण्याकडे भर द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.