गोड खायला खुप आवडते? 'या' पाच लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर...| Healthy Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोड खायला खुप आवडते?

गोड खायला खुप आवडते? 'या' पाच लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

सध्या सणांचा महिना सुरू आहे. गणेशोत्सवात तर सगळीकडे गोडधोड सुरू असते. अशात गोड खाण्याचा मोह आवरत नाही. जर तुम्हालाही गोड खायला आवडत असेल तर चुकूनही काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर याचा विपरीत परिणाम दिसून येईल. चला तर या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

वजन वाढणे
अति प्रमाणात गोड खाल्याने रक्तात साखरेच प्रमाण वाढते आणि वजन वाढते.

तणाव निर्माण होणे

अति प्रमाणात गोड खाल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्यामुळे तणाव वाढतो.

प्रतिकारक्षमता कमी होणे

गोड अति प्रमाणात खाल्ल्याने शरीरात कमजोरी निर्माण होते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने प्रतिकारक्षमता कमी होते

वारंवार तहान लागणे
जास्त गोड खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते आणि त्यामुळे मधूमेहाचा धोका वाढतो.

दात दुखी
अति प्रमाणात गोड खाल्ल्याने दात दुखीचा त्रास निर्माण होतो. सोबतच दाताच्या दातांच्या निगडीत समस्या निर्माण होतात.