
कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनपेक्षा अधिक वेगाने पसरणार
जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात जगभरात जवळपास २.१ कोटी व्यक्तींना कोरोना संक्रमण(Corona infection) झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे आता आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. वेगाने संक्रमित होणारा ओमिक्रॉन (Omicron) हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी नवी रुप उघडकीस येऊ शकतं.
WHOच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना व्हायरसचा पुढचा व्हेरिएंट ओमिक्रॉनपेक्षा जास्त घातक असेल. (Next COVID variant will be more contagious than Omicron WHO warns)
हेही वाचा: कोरोनाचा खेळ खल्लास? WHO म्हणतं, 'ओमिक्रॉन हा शेवटचा...'
सर्व व्हेरिअंटला मागे टाकेल नवीन व्हेरिअंट
WHOनुसार, कोरोना १९च्या टेक्निकल प्रमुख मारिया वेन केखार्वे (Maria Van Kerkhove) यांनी सोशल मिडिया चॅनल्सवरील लाईव्ह परिचर्चेदरम्यान सांगितले की,'' मागील आठवड्याच्या आकडेवारीमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ओमीक्रॉन किती वेगामध्ये पसरत आहे दिसून येते. चांगली गोष्ट ही आहे की, ओमीक्रॉन आधीच्या सर्व व्हेरिअंट इतका धोकादायक नाही, पण नव्याने येणारे सर्व व्हेरिअंट आपल्यासाठी चिंतेचे कारण ठरू शकतात कारण ते आधीपेक्षा जास्त ताकदवान होत आहे. त्यामुळे संक्रमणाचा दर देखील अधिक असू शकतो. येणारा नवा व्हेरिअंटच्या संक्रमण इतक्या वेगात होऊ शकते की जगभरात पसरलेल्या आधीच्या सर्व व्हेरिअंटला तो मागे टाकू शकतो.
पुढचा व्हेरिअंट कमी धोकादायक असण्याची काही खात्री नाही
मारियाने सांगितले की, ''व्हेरिअंटसाठी चिंतेची गोष्ट आहे कारण हे जास्त संक्रमणशील असू शकतो आणि वेगात इतरांना संक्रमित करण्याच्या बाबतीत सध्याच्या सर्व व्हेरिअंटला मागे टाकू शकतो. पण सर्वात मोठा प्रश्न हा देखील आहे की, येणारा नवा व्हेरिअंट जीवघेणा असू शकतो की कमी धोकादायक असू शकतो?''
''व्हायरस काळानुसार सौम्य स्ट्रेमध्ये उत्परिवर्तित होईल आणि आधीच्या व्हेरिअंटच्या तुलनेत कमी लोक आजारी पडू शकतात लोकांनी असे गृहित धरू नये'' असेही मारियाने सांगितले. आपण आशा ठेवू शकतो पण याची कोणतीही खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे लोकांनी सक्तीने कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे.
हेही वाचा: शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे कसे ओळखाल? जाणून घ्या लक्षणे
ओमीक्रॉनच्या विरोधामध्ये व्हॅक्सिनची चाचणी सुरू
मारियाने सांगितले की, ''पुढचा व्हेरिअंटमध्ये व्हॅक्सिनपासून वाचण्याची क्षमता असेल. सध्या जितकी ओमीक्रॉनची आहे त्यापेक्षा जास्त. तो व्हॅक्सिनमुळे निर्माण होणाऱ्या इम्युनिटीच्या बाबतीत जास्त धोकादायक असू शकतो.
ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर, फायझर( Pfizer) आणि बायोएनटेक( Bioentech)ने ओमीक्रॉन विरुद्ध काम करणाऱ्या लसींची चाचणी सुरू केली आहे. परंतू, अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की, ''लसीचा बूस्टर डोस कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याची भीती 90 टक्के पर्यंत वाढवतो.
Web Title: Next Covid Variant Will Be More Contagious Than Omicron Who Warns
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..