
पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिन 2025 च्या भाषणात लठ्ठपणाला भारतासाठी "मूक संकट" म्हटले.
प्रत्येक कुटुंबाने स्वयंपाकाचे तेल 10% कमी वापरावे, असा साधा पण प्रभावी उपाय सुचवला.
योग, चालणे आणि पारंपरिक आहार पद्धती अवलंबून लठ्ठपणा आणि रोगांविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.
PM Modi Independence Day 2025 obesity crisis Red Fort speech: भारताच्या 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, 15 ऑगस्ट 2025 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना लठ्ठपणाविरुद्ध जोरदार आवाहन केले. त्यांनी लठ्ठपणाला "मूक संकट" संबोधून प्रत्येक कुटुंबाला स्वयंपाकात वापरले जाणारे तेल 10% कमी करण्याचा साधा पण प्रभावी सल्ला दिला. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो. मोदींच्या आरोग्य मंत्राने निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देताना देशभरात चर्चा निर्माण केली आहे. लाल किल्ल्यावरील या भाषणात मोदींनी केवळ देशभक्तीच नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश दिला. सोशल मीडियावरही या मंत्राला मोठा प्रतिसाद मिळत असून, लोकांनी निरोगी भारतासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय केले पाहिजे हे जाणून घेऊया.