Surgery मध्ये 'या' रूग्णांना ॲनेस्थेशिया दिला जात नाही, काय आहे Pre-Anaesthesia चेकअप? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pre-Anaesthesia

Surgery मध्ये 'या' रूग्णांना ॲनेस्थेशिया दिला जात नाही, काय आहे Pre-Anaesthesia चेकअप?

Health Care: कुठल्याही रूग्णावर शस्त्रक्रिया करण्याआधी सर्वात आधी त्याला बेशुद्ध करण्यासाठी ॲनेस्थेशिया दिल्या जातं. शस्त्रक्रियेदरम्यान होण्याऱ्या वेदना जाणवू नये यासाठी ॲनेस्थेशिया दिल्या जातं. मात्र ॲनेस्थेशियाबाबत अनेक लोकांना फार मोठा गैरसमज आहे. तो असा की, शस्त्रक्रियेच्या टेबलवर प्रत्येक रूग्णास ॲनेस्थेशिया देतात आणि मगच ऑपरेशनला सुरूवात होते. मात्र असे काहीसे नसून ॲनेस्थेशिया देण्याआधी अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते.

या रूग्णांना ॲनेस्थेशिया देणं धोक्याचं

ॲनेस्थेशियाचे बरेच साइड इफेक्ट्स आहेत. ॲनेस्थेशियाची अनेकांना अॅलर्जी असू शकते. डायबिटीज किंवा हाय ब्लड प्रेशरचा रूग्ण असेल तर त्याला ॲनेस्थेशिया देणं धोक्याचं ठरतं. तर मद्यपान करणाऱ्या व्यक्तीस ॲनेस्थेशियाचे अनेक साइडइफेक्ट्स उद्भवू शकतात.

हेही वाचा: World Anaesthesia Day: ॲनेस्थेशियाने बदलली विज्ञानाची दिशा! कसा लागला शोध?

काय असतं प्री-ॲनेस्थेशिया चेकअप?

जेव्हा डॉक्टर रूग्णास सर्जरी करण्यास सांगतात त्यावेळी सर्जरीआधी प्री-ॲनेस्थेशिया चेकअप करायला सांगतात. त्याला PAC असेही म्हणतात. याच्या मदतीने रूग्णास आणखी कुठला रोग आहे काय याची तपासणी केली जाते. त्यामुळे रूग्णास एखादा आजार असल्यास त्याच्यावर ॲनेस्थेशियाचा काही प्रभाव होऊ शकतो काय हेही तपासले जाते. PAC दरम्यान पेशंटची मेडिकल हिस्ट्री, फिजीकल चेकअप आणि मेडिकल रेकॉर्ड्सचा रिव्ह्यू दिला जातो. जर एखाद्या आजाराशी संबंधित समस्या डॉक्टरांना आढळून आल्यात तर रूग्णाची संबंधित टेस्टही केली जाते.

टॅग्स :Patienthealth