Shingles Rash : या वयोगटातील लोकांना नागीण आजाराचा धोका; लक्षणे जाणून घ्या, उपचारात विलंब झाल्यास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shingles Rash

Shingles Rash : या वयोगटातील लोकांना नागीण आजाराचा धोका; लक्षणे जाणून घ्या, उपचारात विलंब झाल्यास...

वरिष्ठ त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अनिल पत्की

Shingles Rash : आपल्यापैकी अनेकांना लहानपणी कांजिण्या येऊन गेल्या असतील. मात्र, आपल्याला हे माहीत नाही की काही जणांवर या आजाराचा परिणाम दीर्घकाळ किंवा कायमस्वरुपी राहू शकतो. असे रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांच्या शरीरात कांजिण्यांचे विषाणू निष्क्रिय स्वरुपात कायम राहतात. हे विषाणू कालांतराने सक्रिय होतात, विशेषत: वृद्धापकाळ सुरू झाल्यानंतर आणि यातून नागीण (शिंगल्स) नावाचा एक वेगळाच आजार होतो.

वय वाढू लागले की आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. ज्यांना आधी कांजिण्या आल्या होत्या आणि वाढत्या वयासोबत हृदयविकार, मूत्राशयाचे आजार, कर्करोग आणि एचआयव्ही यासारखे इतर आजार जडलेत अशा व्यक्तींना शिंगल्स या आजाराचा म्हणजेच नागीण होण्याचा धोका अधिक असतो. या आजारांमुळे माणसाची रोगप्रतिकारशक्ती अधिकच कमकुवत होते आणि परिणामी नागिणीसारख्या अनेक संसर्गांचा धोका वाढतो.

हेही वाचा - राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

हेही वाचा: Health Tips: मुड बुस्टअप करण्यासाठी ट्राय करा 'या' सिंपल टिप्स

काय असतो हा आजार?

महाराष्ट्रात शिंगल्स या आजाराला आपण ‘नागीण’ म्हणून ओळखतो. शरीराभोवती सापाचे वेटोळे असावे असा चट्टा या आजारात त्वचेवर उमटतो. त्यामुळेच हे नाव पडले आहे. आपल्या स्थानिक प्रचलित धारणांनुसार हे अशुभ मानले जाते. त्यामुळेच, बहुतांश रुग्ण वेळेत, सुरुवातीच्या टप्प्यात उपचार घेत नाहीत. उलट काही स्थानिक पातळीवरील उपचारांचा आधार घेतात.

हेही वाचा: Health Tips : गवतावर अनवाणी चालल्याने होतात फायदे, दररोज चाला इतके तास

आजाराची लक्षणे कशी ओळखायची

  • नागिणीमुळे रुग्णाला प्रचंड वेदना होतात, अस्वस्थता येते.

  • यातील पुरळ आपोआपच कमी होत असले तरी वेदना सातत्याने होत राहतात आणि वृद्धांची दैनंदिन कामेही त्यामुळे कठीण होऊन बसतात.

  • सुमारे १० ते ५० टक्के वृद्ध रुग्णांना नागीण बरी झाल्यानंतरही सातत्याने वेदना होतात.

हेही वाचा: Health Tips : आयुर्वेदीक काढा पिणे आरोग्यासाठी धोकादायक? या आजारांना मिळते आमंत्रण

  • या वेदनांमुळे रुग्णाला अक्षम, असहाय्य वाटू शकते आणि इतर काळजी घेणाऱ्या व्यक्तींवरील त्यांचे अवलंबित्व वाढते.

  • काही रुग्णांच्या शरीरावर नागिणीमुळे कायमस्वरुपी व्रण उमटतात.

  • तुरळक प्रमाणातील रुग्णांना शिंगल्समुळे दृष्टी जाणे, ऐकू न येणे किंवा हातापायांमध्ये अशक्तपणा येणे असे त्रासही होऊ शकतात.

हेही वाचा: Garlic Health Tips : काय सांगताय? लसणाचे एवढे प्रकार आहेत?

नागिणीवर तातडीने वैद्यकीय उपचार व्हायला हवेत

  • वेदना कमी करण्यासाठी आणि या आजारामुळे होणारी गुंतागुंत कमी करण्यासाठी.

  • काही विशिष्ट अँटी-व्हायरल औषधे उपलब्ध आहेत जी नागिणीवर परिणामकारक ठरतात.

  • अर्थात, उपचार अधिक परिणामकारक ठरावेत यासाठी ते वेळेत आणि सुरुवातीलाच करायला हवेत.

हेही वाचा: Health Care Tips : ‘जेव्हा कडक भूक लागते, तेव्हाच खा’ ; वाचा आहार कसा असावा

लस आवश्यक

५० वर्षांवरील सर्व व्यक्तींनी प्रतिबंधात्मक लसींच्या फायद्यांविषयी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करायला हवी. प्रतिबंधात्मक आरोग्यासंदर्भात लसी हा फार महत्त्वाचा भाग आहे.

टॅग्स :health