

थोडक्यात:
सतत बसून राहण्याच्या आणि कमी हालचालीच्या सवयीमुळे सांधेदुखी, कडकपणा आणि हालचालींवर परिणाम होतो.
ऋषभ तेलंग यांच्या मते, काही सोपे व्यायाम नियमित केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
हे व्यायाम सांध्यांची हालचालक्षमता, लवचिकता आणि स्नेहक द्रव सुधारून आरोग्यास फायदेशीर ठरतात.
How To Relieve Back Pain From Sitting Too Long: हल्लीच्या डिजिटल युगात, ऑफिसमधले काम, मोबाईलवर सतत स्क्रॉलिंग करणे, बिंज वॉचिंग करणे हे आरोग्यासाठी हानिकारक बनले आहे. याचा परिणाम आपल्या सांध्यांच्या आरोग्यावर होत आहे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांचा दिवस ऑफिसच्या खुर्चीत बसूनच जातो. घरातसुद्धा फारशी हालचाल होत नाही. पण याच बसून राहण्याच्या सवयीमुळे आपल्या सांध्यांवर परिणाम होत आहे. यामुळे बऱ्याचजणांना सांधे आखडण्याचा, दुखू लागण्याचा त्रास होत आहे आणि कालांतराने हळूहळू त्याचा त्रास वाढतो.