

Why your brain feels slow after waking? The truth about sleep drunkenness.
sakal
Why Your Brain Feels Foggy After Waking Up: कधी असं होतं का, की तुम्ही गाढ झोपेत असताना अलार्म वाजतो किंवा कोणी उठवतं…तुम्ही डोळे उघडता, उठता, चालता, बोलता देखील, पण तरीही मेंदू पूर्णपणे जागा झालेला नसतो? आणि नंतर कुणी सांगितलं तर त्या सगळ्या प्रकाराची तुम्हाला काहीच आठवण राहत नाही? पण असं का?
झोपेचे तज्ज्ञ जुआनकार्लो मार्टिनेज-गोंझालेझ, (एम.डी.) असं सांगतात ही वैद्यकीय अवस्था कॉमन आहे जिला स्लीप ड्रंकनेस किंवा कन्फ्युजनल अराउजल म्हणतात. संशोधनानुसार, हा अनुभव प्रत्येक ७ लोकांपैकी किमान एका व्यक्तीला कधीतरी येतो. आणि त्यावर योग्य उपाय केले तर फायद्याचे ठरते.