
Stale Rotis : डायबिटीज- बीपीचा त्रास असणाऱ्यांनी शिळी पोळी का खावी?
Stale Rotis : अनेकदा आपण रात्रीची पोळी सकाळी खात नाही आणि सकाळची पोळी रात्री खात नाही. कारण शिळी पोळी आपण खाण्यास टाळतो. अनेकदा शिळी पोळी आपण फेकून देतो. पण तुम्हाला माहिती आहे का शिळी पोळी खाण्याचे किती फायदे आहेत?
आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Stale Rotis benefits for Diabetes and blood pressure healthy lifestyle)
जर तुम्हाला तेलाचे पदार्थ किंवा मसालेदार जेवण केल्यानंतर अॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही सकाळी दुधासोबत शिळी पोळी खावी. यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते.
जर कोणाला पोटाशी संबंधीत समस्या असेल तर डायजेशन सिस्टीम खराब राहत असेल तर त्यांनी शिळी पोळी खावी. शिळी पोळी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार. शिळी पोळी दुधासोबत खाल्याने डायजेशन सिस्टीम उत्तम होते.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरंय की शुगर आणि बीपी कंट्रोल करण्यासाठी शिळी पोळी खाणे खुप फायदेशीर असते. शिळी पोळीला सकाळी थंड दुधासोबत खाल्याने ब्लड प्रेशरची समस्या दूर होते. खाण्यापूर्वी जर तुम्ही शिळी पोळीला थंड दुधात 10 मिनिटे भिजवून ठेवले तर आणखी फायदेशीर ठरतं
तज्ञांच्या मते शिळी पोळी ही शरीराचं तापमान नॉर्मन ठेवण्यास मदत करते. मात्र उन्हाळ्यात शिळी पोळी खाणे चांगले नसते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.