World Sleeping Day: मला जेव्हा ताण येतो तेव्हा.. स्ट्रेस आल्यावर पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे काय करतात?

स्ट्रेस आल्यावर पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे काय करतात? जाणून घ्या
Anand Deshpande
Anand Deshpandesakal

देशभर वाढणारी स्टार्टअप संस्कृती आणि दिग्गज उद्योजकांची कहाणी आज करोडो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेकांनी लाखो-कोटींच्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले आणि व्यावसायिक जगतात क्षेत्रात नावलौकिकाला आले.

यामध्ये, पर्सिस्टंट सिस्टम्स या सुप्रसिद्ध टेक कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे यांचे नाव येते. यांनी अमेरिकेतील नोकरी सोडून पुण्यात आयटी कंपनीची स्थापना केली.

महाराष्ट्रातील अकोला येथे आनंद देशपांडे यांचा जन्म झाला आहे. आयआयटी खरगपूरचे विद्यार्थी असलेले देशपांडे यांना अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर हेवलेट पॅकार्ड (एचपी) मध्ये मोठी नोकरी मिळाली. पण, त्यांचा उद्देश नोकरी करण्याचा नसून लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा होता, त्यामुळे ६ महिन्यांनी त्यांनी राजीनामा दिला आणि भारतात आले.

Anand Deshpande
Artificial Intelligence आल्यावर नोकऱ्यांचे काय होणार? Persistent या IT कंपनीचे संस्थपाक आनंद देशपांडे काय म्हणाले?

आनंद देशपांडे यांना 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' विषयी काय वाटतं याविषयी 'सकाळ' ची विशेष पॉडकास्ट सिरीज 'आमच्या काळी' मध्ये त्यांनी सविस्तर सांगितले आहे. तसेच या पॉडकास्ट सिरीजमध्ये आनंद देशपांडे यांनी स्ट्रेस आल्यावर ते काय करतात, याबद्दल सांगितले आहे.

'आमच्या काळी' या सिरीजमध्ये आनंद देशपांडे म्हणाले, "मी स्ट्रेस आल्यावर झोपतो. स्ट्रेस सिच्युएशनमध्ये तुम्ही निर्णय घेता तेव्हा ते अजून वाईट होऊ शकतात. कधी पण खूप वाईट सिच्युएशन झाली तर शांतपणे म्हणायचं की जाऊ दे आज, मी स्ट्रेस मोडमध्ये आहे. सगळं काही सुटणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा फ्रेश विचार करून काय सोडवता येईल तसं बघायचं आणि एक एक करून पुढे जायचं."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com