Health Tips : अचानक कान दुखू लागल्यास घाबरु नका, लगेच 'हे' उपाय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips

Health Tips : अचानक कान दुखू लागल्यास घाबरु नका, लगेच 'हे' उपाय करा

कानात सतत खाज येते का? कानात खाज येणे ही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे कानात संसर्ग (ear infection) होऊ शकतं. पावसाळ्यात अचानक कान दुखीचा त्रास बऱ्याचदा होतो. त्याचवेळी, यामुळे तुम्हाला भयंकर वेदना (ear pain) देखील होऊ शकतात. कान हा शरीराचा एक नाजूक भाग आहे आणि खाज सुटणे किंवा दुखणे यापासून आराम मिळवण्यासाठी कानात कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे तुम्हाला महागात पडू शकते.

हेही वाचा: Health Tips : झोपेची सायकल बिघडलीये? रात्री 'या' गोष्टी खाणे टाळा

काही घरगुती उपाय आहेत जे तुम्हाला कानदुखी आणि इतर समस्यांपासून आराम देऊ शकतात.

कोरफड

जर कानात खाज येत असेल तर घरातील कोरफडीचे रोप चमत्कारिक ठरू शकते. डोके एका बाजूला झुकवून तुम्ही एलोवेरा जेलचे तीन ते चार थेंब कानात टाकू शकता. ते बाहेर काढण्यापूर्वी काही सेकंद ते थेंब कानातच राहू द्या. कोरफड कानाच्या आतील भागातील पीएच पातळी सुधारते. त्याचे अँटीइन्फ्लमेट्री गुणधर्म कोरडे, खाज येणा-या, जळजळणा-या कानांना शांत करतात.

हेही वाचा: Health Tips : हे दोन पाँईंट दाबा आणि शुगर पूर्ण कंट्रोल करा

आलं

आल्यामध्ये नैसर्गिक अँटीइन्फ्लमेट्री गुणधर्म असतात जे कानदुखीपासून मुक्त होण्यास फायदेशीर ठरू शकतात आणि कानाला खाज सुटण्यापासून देखील आराम देऊ शकतात. आल्याचा रस कानाच्या सभोवतीने लावा किंवा आल्याचा रस गरम करून गाळून तेलात मिक्स करा. हे मिश्रण किंवा तेल कानाच्या बाहेरून मागच्या व सभोवतीच्या सर्व भागावर लावा. आल्याचा रस चुकूनही थेट कानात घालू नका.

हेही वाचा: Health: सततची डोकेदुखी असले, तर आता पेनकिलर ऐवजी या घरगुती उपायांनी दुर करा डोकेदुखी

तेल

अनेक एसेंशियल ऑइल्स आहेत ज्याचा वापर कानांतील खाज दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. यामध्ये खोबरेल तेल, वनस्पती तेल, ऑलिव्ह ऑइल आणि चहाच्या झाडाचे तेल जे पातळ झालेले असेल समाविष्ट आहे. हे तेल लावण्यासाठी तुम्ही फक्त एक चमचे तेल कोमट गरम करू शकता. एक ड्रॉपर घ्या, आपले डोके बाजूला वाकवा आणि कानात काही थेंब टाका. सुमारे एक किंवा दोन मिनिटांनंतर, तेल निघून जाण्यासाठी आपले डोके मागे सरळ ठेवून झोपा व तेल बाहेर काढा आणि अतिरिक्त तेल कपड्याने पुसून घ्या.

हेही वाचा: Health News : मेथी पावडरचे महिलांसाठी कोणते फायदे आहेत? जाणून घ्या...

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलचा वापर कानदुखीवर चांगला उपचार आहे. कानात ऑलिव्ह ऑइलचे थेंब टाकल्यास कानदुखी शांत होऊ शकते. कानात ऑलिव्ह ऑइलचे काही कोमट थेंब टाकणे सुरक्षित आहे. मुलांच्या बाबतीत ते वापरणे टाळा.

टॅग्स :TipsRemedieshealth