Surya Grahan : जाणून घ्या, सूर्यग्रहणाचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Surya Grahan

Surya Grahan : जाणून घ्या, सूर्यग्रहणाचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का?

Surya Grahan Effect On Metal Health : आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण सुरू झाले आहे. या सर्वामध्ये नागरिकांच्या मनात एक न अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील. त्यातीलच एका प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

हेही वाचा: Surya Grahan 2022 : ग्रहणानंतर पहिले कोणत्या पदार्थाचे सेवन करावे?

ग्रहण धार्मिक श्रद्धेशी देखील जोडले गेले आहे आणि असे मानले जाते की, याचा आरोग्यावर परिणाम होतो. सूर्यग्रहणाचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो असे लोक मानतात. चार दशकांपूर्वी म्हणजेच 1981 मध्ये इंडियन जर्नल ऑफ सायकियाट्रीमध्ये एक संशोधन प्रकाशित झाले होते, ज्यामध्ये पबमेड सेंट्रलला स्थान देण्यात आले होते. या संशोधनात अशा लोकांचा समावेश करण्यात आला होता ज्यांचे मानसिक आरोग्य चांगले नव्हते.

हेही वाचा: Surya Grahan Photography : मोबाईलवरून असे क्लिक करा सूर्यग्रहणाचे भन्नाट फोटो

संशोधनात असा निष्कर्ष काढण्यात आला की, ग्रहणाच्या वेळी स्किझोफ्रेनिया, क्रॉनिक डिप्रेशनने त्रस्त लोकांच्या समस्यांमध्ये वाढ होते. या आजारांनी त्रस्त रूग्णांमध्ये प्रोलॅक्टिन हार्मोनचे प्रमाण वाढले होते. मात्र, नासाच्या शास्त्रज्ञांनी असा कोणताही बदल झाल्याचे नाकारले आहे. याशिवाय सूर्यग्रहण कोणत्याही संरक्षणाशिवाय बघितल्यास डोळ्यांच्या रेटिनल पेशींना इजा होऊ शकते असेदेखील सांगितले जाते.

हेही वाचा: Surya Grahan 2022 : भारतात दिसणारं आंशिक सूर्यग्रहण नेमकं काय? कुठे दिसणार

सूर्यग्रहणाबाबत संशोधन

पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्याच्या किरणोत्सर्गाचे मुख्य स्त्रोत असलेल्या इन्फ्रा रेड आणि अल्ट्रा व्हायोलेटवर सातत्याने संशोधन सुरू आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी होणाऱ्या किरणोत्सर्गाचा पर्यावरणावर आणि जैविक व्यवस्थेवर परिणाम होतो का? यावरही संशोधन सुरू आहे. सूर्यग्रहणांचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो हे आतापर्यंतच्या कोणत्याही संशोधनात सिद्ध झालेले नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. आरोग्याशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन अवश्य घ्या.