Swasthyam 2022 : पुण्यात आजपासून ‘सकाळ स्वास्थ्यम्’

आरोग्याचे विविध पैलू अनोख्या पद्धतीने उलगडून दाखविणाऱ्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाला शुक्रवारपासून (ता. ९) पुण्यात प्रारंभ होत आहे.
Swasthyam
Swasthyamsakal
Summary

आरोग्याचे विविध पैलू अनोख्या पद्धतीने उलगडून दाखविणाऱ्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाला शुक्रवारपासून (ता. ९) पुण्यात प्रारंभ होत आहे.

पुणे - आरोग्याचे विविध पैलू अनोख्या पद्धतीने उलगडून दाखविणाऱ्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाला शुक्रवारपासून (ता. ९) पुण्यात प्रारंभ होत आहे. रविवारपर्यंत (ता. ११) चालणाऱ्या या उपक्रमात मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी योगासने, आध्यात्मिकता, संस्कृती, संगीत, कला अशा विविध पैलूंवर सादरीकरण आणि व्याख्याने होणार आहेत. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘वुई आर इन धिस टुगेदर’ या मोहिमेद्वारे आयोजित या अनोख्या उपक्रमात सहभागी प्रत्येक व्यक्तीला रोजच्या जगण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात तज्ज्ञ, व्याख्याते आणि सादरकर्ते उपस्थित राहणार आहेत. प्रख्यात कवी, प्रेरणादायी व्याख्याते डॉ. कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी सहा वाजता स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम कसे राखावे, त्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि योगासने कशी उपयुक्त ठरतात याबद्दल गौरांग दास, श्री एम, सर्वेश शशी, डॉ. हंसाजी योगेंद्र, उस्ताद राशीद खान, प्रियांका पटेल, नूपुर पाटील आदी प्रख्यात १३ तज्ज्ञांकडून निरामय जीवनाचे धडे नागरिकांना मिळणार आहेत.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ आणि सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स असलेल्या तज्ज्ञांशी प्रत्यक्ष संवाद होणार आहे. ‘सोहळा स्वास्थ्याचा, जागर आरोग्याचा’ अशी ‘सकाळ स्वास्थ्यम्’ची संकल्पना आहे. त्यासाठीच योग, अध्यात्म, ध्यान, संगीत, फिटनेस, आहार आदींबाबत तज्ज्ञांकडून उपयुक्त टिप्स दिल्या जाणार आहेत. त्यासाठी शहरात गणेश कला क्रीडा मंच, डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स आदी पाच ठिकाणी शुक्रवार (ता. ९), शनिवार (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) कार्यक्रम होणार आहेत.

पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आधुनिक व स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन खूप थकून जाते. त्यामुळे ताणतणाव वाढून, मानसिक आरोग्य बिघडते. त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होते. अशा परिस्थितीत शरीर आणि मनाला स्थिर व सुदृढ आरोग्य राखण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम व योगासने सर्वोत्तम उपाय आहे. दैनंदिन आयुष्यात त्यांची उपयुक्तता आणि शास्त्रीय मार्गदर्शन नागरिकांना देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरात पहिल्यांदाच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात तज्ज्ञांकडून नागरिकांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्याला पुणेकरांनीही उस्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे ‘सकाळ’च्या केंद्रांवरील बहुतांश प्रवेशिका संपल्या आहेत.

समाजाचे कल्याण डोळ्यांसमोर ठेवून ‘सकाळ माध्यम समूह’ काम करतो. समाजाचे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहिले पाहिजे, या उद्देशाने आम्ही सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम आखतो. स्वास्थ्यम् उपक्रमाचे आयोजन याचदृष्टीने केले आहे. शारीरिक आरोग्यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यानधारणेची जशी आवश्यकता आहे, तशीच मानसिक आरोग्यासाठी कला, संगीत, साहित्याची नितांत गरज आहे. ‘स्वास्थ्यम्’मधील प्रत्येक कार्यक्रमाची निवड विचारपूर्वक केली आहे. या उपक्रमाला पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद आमची उमेद वाढविणारा आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे समाजकल्याणाचे उपक्रम आम्ही घेऊन येऊ.

- अभिजित पवार, संस्थापक अध्यक्ष, एपी ग्लोबाले, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह

तीन दिवसांत यांचे मिळणार मार्गदर्शन व विषय

  • ख्यातनाम कवी, व्याख्याते कुमार विश्वास : दैनंदिन जीवन समृद्ध करण्यासाठी रामायण आणि महाभारतातील शिकवण - (शुक्रवार ९ डिसेंबर - सांयकाळी ६.०० वाजता, गणेश कला-क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे.)

  • डॉ. राजेंद्र बर्वे : आजची नवीन सामान्य स्थिती आणि मन - (शुक्रवार ९ डिसेंबर - कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी)

  • अभिनेत्री शिल्पा शेट्टी : कीप इट सिम्पल - योगा आणि फिटनेस - (शनिवार १० डिसेंबर - कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी)

  • सूफी गायिका रुहानी सिस्टर्स - सुफियाना, - मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत आणि गायन - सायंकाळी ६.३० (गणेश कला-क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे.)

  • उस्ताद राशीद खान - रात्री ८.३०

  • सर्वेश शशी : योगा, फिटनेस आणि त्यापलीकडे - (शनिवार १० डिसेंबर - कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी)

  • अ‍ॅक्शन दिग्दर्शक चित्ता शेट्टी : मार्शल आर्ट्सद्वारे शारीरिक तंदुरुस्ती आणि स्वास्थ्य - (शनिवार १० डिसेंबर - कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी)

  • प्रियांका पटेल : इमर्सिव्ह साउंड्स : साउंड हीलिंग कार्यशाळा - (शनिवार १० डिसेंबर - कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी)

  • डॉ. हंसाजी योगेंद्र : योगा : अ होलिस्टिक अ‍ॅप्रोच फॉर हेल्थ अँड वेलबिइंग - (रविवार ११ डिसेंबर - सकाळी १०.३० वाजता, पंडित फार्म्‌स, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे)

  • अध्यात्म गुरू संत श्री गौरांग दास : आनंदी जीवनाची कला - (रविवार ११ डिसेंबर - सकाळी ११.३० वाजता, पंडित फार्म्‌स, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे.)

  • नूपुर पाटील : लर्न द रिअल मिनिंग ऑफ द वर्ड डाएट - (रविवार ११ डिसेंबर - दुपारी ३.३० वाजता, पंडित फार्म्‌स, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे)

  • योगगुरू श्री एम : योग, अनंत क्षमतेचा मार्ग - (रविवार ११ डिसेंबर - सायंकाळी ६.०० वाजता, पंडित फार्म्‌स, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे)

  • अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख : लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन तसेच त्यांच्या उपस्थितीत आगामी ‘वेड’ या चित्रपटाचे प्रमोशन - (रविवार ११ डिसेंबर : दुपारी २.०० वाजता, पंडित फार्म्‌स, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com