Swine Flue Alert : स्वाइन फ्लू बाधिताने स्पर्श केलेल्या वस्तूतून संसर्गाची भीती..

कोरोना आणि स्वाईन फ्लूची लक्षणं एकसारखीच आहेत. स्वाइन फ्लू अर्थात एच १ एन१ हा विषाणू नाक, घसा आणि फुफ्फुसातील पेशींना संक्रमित करतो
Swine Flue Alert
Swine Flue Alert esakal

Swine Flue Alert : ‘स्वाईन फ्लू’ श्वसननलिकेत होणारा संसर्ग आहे. इन्फ्लूएन्झा ‘टाइप-ए’ च्या ‘एच१एन१’ या विषाणूंमुळे हा आजार होतो. ‘स्वाईन फ्लू’ हा सामान्य ‘फ्लू’ अर्थात साध्या तापासारखा आहे. याची लक्षणेदेखील सामान्य तापासारखीच आहेत. मात्र खोकला, सर्दी किंवा स्वाईन फ्लूने संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूंना हात लावल्यानेही संसर्ग पसरण्याची शक्यता असते. नाक, डोळे आणि तोंडावाटे हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो.

कोरोना आणि स्वाईन फ्लूची लक्षणं एकसारखीच आहेत. स्वाइन फ्लू अर्थात एच १ एन१ हा विषाणू नाक, घसा आणि फुफ्फुसातील पेशींना संक्रमित करतो. शरीरात प्रवेश केल्यानंतर १ ते ७ दिवसांच्या कालावधित रुग्ण स्वाईन फ्लू संक्रमित होतो. लक्षणे दिसू लागल्यानंतर पुढील सात दिवस रुग्ण हा आजार दुसऱ्यांमध्ये पसरवू शकतो.

लहान मुले दीर्घकाळ स्वाईन फ्लूचा संसर्ग पसरवू शकतात. इन्फ्लूएन्झा विषाणूचे विविध प्रकार आहेत. कमी-जास्त प्रमाणात हे विषाणू गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरतात, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे म्हणाले.

स्वाइन फ्लूची लक्षणे

ताप (१०२-१०३ डिग्री)

थंडी वाजणे

खोकला (कफ होणे)

घशात खवखव होणे

अंगदुखी-डोकेदुखी

खूप जास्त थकवा येणं

डायरिया, उलट्या होणे

Swine Flue Alert
Health Care News: सकाळी उठल्याबरोबर 'ही' लक्षणे दिसली तर करू नका दुर्लक्ष, असतील हृदयविकाराची लक्षणे

हे करा

वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.

पौष्टिक आहार घ्या.

लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात वापर करावा

धूम्रपान टाळा

पुरेशी झोप घ्या

भरपूर पाणी प्या

सॅनीटायझरने हात निर्जतुंक करावा

खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा

वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तु, जागा निंर्जतूक करा

हे करू नका

हस्तांदोलन

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका

आपल्याला लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका (Health)

Swine Flue Alert
Swine Flu Update : स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला

स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना न्यूमोनिया, बॅक्टेरिअल न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस अशा प्रकारची गुंतागुंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधुमेह, हृदयरोग अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूची लागण झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच सहव्याधी असलेल्या रुग्णांनी इन्फल्युएंझां ए लसीकरणाच्या डोस घ्यावा. गर्भवती स्त्रिया, लहान मुले यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

-डॉ. गोवर्धन नवखरे, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका,नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com