Symptoms Of Severe Disease : तोंडाला कोरड पडत असेल तर असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका

सातत्याने तोंडाला कोरड पडत असेल तर रक्तात साखर वाढण्याची (हायपरग्लायसेमिया) जोखीम आहे.
Symptoms Of Severe Disease
Symptoms Of Severe Diseaseesakal

Symptoms Of Diabetes : उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तोंडाला कोरड पडते. तहान लागते. पाणी प्यायल्यावर जरा बरे वाटते. उन्हाळ्यात असे होणे ठीक आहे, पण सातत्याने असे होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

जेव्हा तोंडातील लाळ ग्रंथी पुरेशी लाळ तयार करत नाहीत, तेव्हा कोरडे तोंड होऊ शकते. शरीरात लाळ तयार करण्यासाठी पुरेसा द्रवपदार्थ नसतो तसेच चिंताग्रस्त वाटत असल्यास तोंड कोरडे होते. मात्र सातत्याने तोंडाला कोरड पडत असेल तर रक्तात साखर वाढण्याची (हायपरग्लायसेमिया) जोखीम आहे.

गोड आजार अर्थात मधुमेह तसेच उच्च रक्तदाब किंवा कॅन्सर तसेच औषधांमुळे तोंडाला कोरडेपणा येण्याची शक्यता असते. या औषधांमुळे आवश्यक तेवढी लाळ तयार होत नाही आणि तोंड कोरडे पडते. त्यामुळे कोरडे पदार्थ खाताना तोंडात जखमाही होतात. यामध्ये रुग्णांना गिळताना त्रास होतो. तसेच जिभेवर चट्टा होतो. दातांवर कीड येते, अशी लक्षणे दिसतात. हे गंभीर स्वरूपाचे आजार नसले तरीदेखील खाण्याची दैनंदिन क्रिया त्रासदायक ठरते, असे डॉ. मोहन येंडे म्हणाले. (Lifestyle)

Symptoms Of Severe Disease
Diabetic Patients : आता मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 10 सेकंदात तयार होणार इन्सुलिन, वाचा कसं ते?

कोरड पडण्याची कारणे

लाळग्रंथीच्या विकारात तोंडाला कोरड येते.

मानसिक तणाव आल्यास

तोंडावाटे श्वास घेण्याची सवय असल्यास

अतिमद्यपान

पाणी कमी पिणे हे देखील कारण आहे.

कॅन्सर उपचारात रेडिएशनतर थेरपीने तोंडाला कोरड येते.

मधुमेहासह रक्तदाबातही औषधांचा दुष्परिणामातून असे होते.

वारंवार तोंडाला कोरड पडल्यास रक्तातील साखर वाढण्याचा अर्थात हायपरग्लायसेमियाचा धोका असतो. अशावेळी शहाळ्याचे पाणी, लिंबू पाणी प्यावे. दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी प्यावे. तोंडात दोन चार काळे मिरे चघळावे. याशिवाय जीभ खळबळीत झाल्याचे किंवा चव नसल्याचे लक्षण दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Diabetes)

Symptoms Of Severe Disease
Diabetes: कमी झोपाल तर वाढेल ब्लड शुगर, डायबिटीज रूग्णांनी एवढे तास घ्यावी झोप

घशाला कोरड पडल्यास या गोष्टी करा

हे करा...

दर एक तासांनी घोटभर तरी पाणी प्यावे

बर्फ चघळावा

कोरडे, कडक पदार्थ टाळावेत

आहारात सूप, पातळ भाजीचा समावेश करावा

दिवसभरात दोन वेळा ब्रश करावे

लक्षणे

गिळताना त्रास होणे

पापड, बिस्किटे खाताना त्रास होतो

बोलताना जीभ टाळूला चिकटून बोलताना त्रास होतो

वारंवार जखमा आणि संसर्ग होणे

-डॉ. मोहन येंडे, आयुर्वेद तज्ज्ञ,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com