Bad Cholesterol दूर करण्यासाठी हिवाळ्यात खा या 5 गोष्टी अन् बॅड कोलेस्ट्रॉलला म्हणा बाय बाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bad Cholesterol

Bad Cholesterol दूर करण्यासाठी हिवाळ्यात खा या 5 गोष्टी अन् बॅड कोलेस्ट्रॉलला म्हणा बाय बाय

Winter Health Care: थंडीच्या दिवसांत अनेकांना अंथरूणात खिळून बसावेसे वाटते. तर अनेकांना चहासोबत पकोडे खायला आवडते तर कोणाला गरमागरम समोसे आणि कचोऱ्या आवडतात. तर दुसरीकडे रात्री उशिरा पिझ्झा खाण्याचा आनंद कोणासाठी भारी असू शकतो. मात्र या खाण्याच्या सवयी शरीरासाठी किती हानिकारक ठरू शकतात याची कल्पना तुम्हाला आहे काय?

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी आधीच वाढली असेल तर अशा वेळी या गोष्टींचा आहारात समावेश करणे खूप महत्वाचे आहे जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयाची काळजी घेण्यास मदत करतात. येथे जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ.

ओट्स - फायबर युक्त ओट्स शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात आणि त्याबरोबरच खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवत तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

हिरव्या भाज्या - कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश केला जाऊ शकतो. या भाज्यांमध्ये फायबर असते जे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्ऱॉल शोषून घेण्यापासून रोखते तसेच ते रक्तापर्यंत पोहोचू देत नाही. याशिवाय फायबर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते, ज्यामुळे वजनही कमी होते.

केळी - केळीमध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे संतुलन राहते, वारंवार भूक लागत नाही आणि शरीरात कोलेस्ट्रॉल प्रसार होण्यास प्रतिबंध होतो.

हेही वाचा: Winter For Women: पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त थंडी का वाजते? कारण...

लसूण

लसणात अॅलिसिन आढळते, हा एक प्रकारचा बायोअॅक्टिव्ह घटक आहे जो रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढवणारे घटक कमी करण्यास मदत करतो. लसणाची एक कढीही रोज खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. यात कॅटेचिन असते जे कोलेस्ट्रॉलचा प्रभाव कमी करते. ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासही मदत होते.