Dry Dates for Weight Loss : वाढलेल्या वजनाला त्रासलात? खारकेचं असं सेवन ठरेल फायदेशीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dry Dates

Dry Dates for Weight Loss : वाढलेल्या वजनाला त्रासलात? खारकेचं असं सेवन ठरेल फायदेशीर

Dry Dates for Weight Loss : आरोग्यासाठी अनेक प्रकारचे ड्रायफ्रुट्सचे सेवन आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे मानले जाते. बहुतेकांना ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम आणि मनुके खाण्यास आवडतात. परंतु, ड्रायफ्रुट्समधील खारीक अनेकांना खाण्यास आवडत नाही. पण, खारीक खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळण्यास मदत होते.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Weigh Loss Breakfast : वजन कमी करण्यासाठी झटपट बनवा सोया पोहे

खारकेत एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. खारकेच्या सेवनामुळे वजन कमी करण्यासही मदत होते. आज आम्ही हिवाळ्यात खारीक खाण्याचे नेमके फायदे काय याबाबत माहिती सांगणार आहोत.

Weight

Weight

हेही वाचा: उपवासामुळे वाढलेले वजन कमी करायचे? ट्राय करा या हेल्दी डिश

वजन होते कमी

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, सर्वात पहिले गोड पदार्थांचे सेवन बंद करा. यासाठी तुम्ही साखरेऐवजी खारकेचे सेवन करू शकता. चहात सारखेऐवजी खारीक बारीक करून ते तुम्ही चहामध्ये टाकू शकता.

रक्तदाब राहतो नियंत्रित

आज अनेकांना हाय बीपीची समस्या आहे. यावर आराम मिळवण्यासाठीदेखील सुक्या खारीक तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. खारकेती ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यात मदत करतो. कोरडी खारीक खाण्यात अडचण येत असल्यास तुम्ही खारीक भिजवून खाऊ शकता.

हेही वाचा: Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी चहा सोडावा लागणार? जाणून घ्या एक्सपर्ट टीप्स

कॅन्सरचा धोका होतो कमी

रोज कोरडी खारीक खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. खारकेत विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे हृदयविकार, कर्करोग, अल्झायमर आणि मधुमेह यांसारख्या विशिष्ट रोगांवर प्रतिबंध ठेवण्यास मदतगार ठरू शकतो. याच्या सेवनाने पोटात चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढते, जी आरोग्यासाठी अतिशय चांगली मानली जाते.

पोटाच्या समस्येवर रामबाण

जर तुम्हाला लूज मोशनचा त्रास जाणवत असेल किंवा वारंवार पोटदुखीची समस्या जाणवत असेल तर, तुम्ही आहारात खारकेचा अवश्य समावेश करा. खारकेत अतिसार प्रतिबंधक घटक असतात, ज्यामुळे जुलाबासारख्या समस्या रोखण्यात फायदेशीर ठरतात.