Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी चहा सोडावा लागणार? जाणून घ्या एक्सपर्ट टीप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss Tips

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी चहा सोडावा लागणार? जाणून घ्या एक्सपर्ट टीप्स

Weight Loss Tips : चहा म्हणजे, तुमच्या आमच्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. दिवसातून अनेकवेळा चहा तर हवाच या उक्तीप्रमाणे सर्वचजण मिळेल तिथे चहा पितात. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांची तर कपावर कप अशी थप्पीच लागते.

हेही वाचा: Weight Loss Tips : हिवाळ्यात वजन झपाट्याने होईल कमी, करा या टिप्स फॉलो

पण हाच चहा प्यायल्यानंतर आपले वजन वाढते असे अनेकांना वाटते. त्यामुळे चहा बंद करावा का असा विचार लोक करतात. काही तो बंदही करतात पण काहींसाठी चहा म्हणजे जगण्यासाठी लागणारे एनर्जी ड्रिंक असल्याने ते बंद करणे जमत नाही.

हेही वाचा: Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? अशनीर ग्रोवरनेही 'या' दोन गोष्टी फॉलो करत कमी केले 10 किलो वजन

चहा सोडण्याचा विचार काही लोक करू शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना वजन कमी करण्यासाठी मसाला चहा पिण्यास सांगण्यात येते. खरी वस्तुस्थिती अशी आहे की, चहाने वजन वाढत नाही. तर आपण त्यात टाकलेले घटक वजन वाढवण्याचे काम करतात. फुल फॅट क्रीम दूध आणि साखरेने वजन वाढते. याबद्दल आहारतज्ञ डॉ. स्नेहा अडसुळे यांचा काय सल्ला आहे जाणून घेऊ.

हेही वाचा: Weight Loss Tips : दिवाळीत फराळावर ताव मारलाय? हे ड्रिंक करेल शरीर डिटॉक्स करायला मदत

डॉ. स्नेहा अडसुळे यांच्यामते, जर तुम्ही योग्य प्रकारे चहा पिलात तर तो आरोग्यासाठी चांगला ठरू शकतो. पण, जर चहाचे मिश्रण चुकीचे असेल तर त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तुमचा रेग्युलर चहा जास्त फॅट असलेले दूध आणि साखर घालून बनवला जातो. चहाच्या एका कपामध्ये 120-150 कॅलरीज असतात. त्यामुळे जर तूम्ही दिसवातून पाचवेळा चहा पीत असाल तर तुमचे वजन अजिबात कमी होणार नाही.

हेही वाचा: Weight Loss Tips: ‘या’ पध्दतीने पांढरा भात खाऊन देखील तुमचे वजन कमी होऊ शकते

त्या पूढे सांगतात की, दिवसातून एक किंवा दूसरा कप चहा घेतला तर चालू शकते. त्यामूळे तूमच्या वजनात फारसा फरक पडणार नाही. पण तुम्ही यापेक्षा जास्त चहा घेत असाल तर तुमच्या लठ्ठपणाचे कारण चहा बनू शकते.

हेही वाचा: Weight Loss Tips: लग्नाआधी वजन कमी करायचंय? फॉलो करा खास टिप्स

असा प्या चहा

दिवसातून 4 कप चहा पिणे हे प्रत्येक भारतीय घरातील चित्र आहे. त्यामूळे चहा बंद करणे अनेक लोकांसाठी अवघड बाब आहे. त्यामुळे चहा बनवा पण कमी साखर असलेलो किंवा गूळ घातलेला. केवळ साखरेच्या जागी गूळ वापरून वजन कमी होणार नाही. तर, चहाचे प्रमाणही कमी असायला हवे.

हेही वाचा: Weight Loss Tips: नाश्त्याला हे 5 पदार्थ खाऊ नका, वजन होईल कमी

अनेक अहारतज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी आणि स्पाइस टी पिण्याची शिफारस करतात. ज्यामध्ये जायफळ, आले, लवंग, काळी मिरी, तुळस, दालचिनी आणि मसाले घालून चहा बनवला जातो.या चहामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो.त्यामुळे हे खोटे आहे की, चहाने वजन वाढते. पण जास्त चहा घेतलात तर वजन दूप्पट होऊ शकते.