जेवणानंतर फक्त १०० पावलं चालल्याने शरीरात होतील हे बदल; डॉ. श्रीराम नेनेंचं गुपित जाणून घ्या

BENEFITS OF WALKING 100 STEPS AFTER MEALS: जेवणानंतर बसण्याची किंवा डायरेक्ट झोपण्याची सवय बऱ्याचजणांना असते. पण, जेवणानंतर काही मिनिटांसाठी का असेना, आरोग्यासाठी चालणं महत्त्वाचं असतं.
DR SHRIRAM NENE HEALTH TIPS ON WALKING

DR SHRIRAM NENE HEALTH TIPS ON WALKING

sakal

Updated on: 

DR SHRIRAM NENE HEALTH TIPS ON WALKING AFTER MEALS: सहसा जेवण झालं की बसण्याची किंवा डायरेक्ट झोपण्याची सवय बऱ्याचजणांना असते. पण, जेवणानंतर काही मिनिटांसाठी का असेना, आरोग्यासाठी चालणं महत्त्वाचं असतं. आयुर्वेदातही यालाच शतपावली म्हणतात. याचाच अर्थ १०० पावलं चालणं असा होतो.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती आणि कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने यांनीही सोशल मीडियावर शतपावलीबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या मते, जेवणानंतर २ ते ५ मिनिटं अगदी सहज आणि आरामात चालणं पुरेसं आहे. यासाठी कोणताही ठराविक वेग किंवा स्टेप्सचा मोठा टार्गेट ठेवण्याची गरज नाही. त्याच पार्श्वभूमीवर शतपावलीचं महत्त्व आणि फायदे जाणून घेऊया.

Loading content, please wait...