
थोडक्यात:
फिटनेससाठी आहार-व्यायाम करूनही वजन कमी न होणाऱ्यांसाठी मौनजारोसारखी वजन कमी करणारी इंजेक्शन औषधं बाजारात आली आहेत.
भारतात अवघ्या ३ महिन्यांत मौनजारोची विक्री ५० कोटींवर पोहोचली असून, महिन्याचा खर्च १४–१७ हजार असूनही मागणी वाढतेय.
ही औषधं वजन कमी करण्यात प्रभावी असली तरी प्रत्येकासाठी योग्य नाहीत; डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.
Weight loss solution for non-responsive obesity cases: फिट राहण्यासाठी सगळेचजण सध्या डाएट, व्यायाम, इंटरमिटंट फास्टिंग (intermittent fasting), डिटॉक्स... असं बरंच काही करत असतात. पण तरी अनेक जणांचं वजन काही केल्या घटत नाही. पण आता बाजारात एक अशी इंजेक्शन प्रकारची औषधं आली आहेत, ज्यामुळे शरीराचं वजन कमी होण्यास मदत होतेय.
मार्च 2025 मध्ये भारतात मौनजारो (Mounjaro) हे औषध लॉन्च झालं आणि अवघ्या ३ महिन्यांत याची विक्री ५० कोटी रुपयांवर गेली. एक इंजेक्शन दर आठवड्याला आणि महिन्याचा खर्च तब्बल १४ ते १७ हजार रुपयांच्या घरात! एवढं महाग असूनही लोक त्याकडे आकर्षित होत आहेत. आणि त्यामागचं कारण आहे; मिळणारे ‘रिझल्ट्स’.
भारतात आज जवळपास ४०% लोक स्थूलतेने किंवा लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. शहरी जीवनशैली, इंस्टंट आणि पॅकेज्ड फूड, व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय. एका अंदाजानुसार, 2050 पर्यंत ४४ कोटी भारतीय लठ्ठ होतील. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधणं गरजेचं झालं आहे.
मौनजारो आणि वेगोवी ही दोन औषधं सध्या भारतात उपलब्ध आहेत. मूळतः ही औषधं डायबिटीजसाठी बनवलेली असली तरी ती वजन कमी करण्यासाठी सुद्धा वापरली जात आहेत.
मौनजारो आणि वेगोवी या औषधांची किंमत महिन्याला सरासरी १७,००० रुपये इतकी आहे. तरीही भारतात याची मागणी प्रचंड वाढली आहे.
डॉक्टरांच्या मते, ही औषधं शरीरातील नैसर्गिक हार्मोन्ससारखीच काम करतात. त्यामुळे पुढील परिणाम दिसून येतात:
भूक कमी होते
पोट भरल्यासारखं वाटतं
ब्लड शुगर नियंत्रणात राहतं
यामुळे हळूहळू वजन कमी होऊ लागतं. विशेष म्हणजे, हे इंजेक्शन आठवड्यातून फक्त एकदाच द्यावे लागते.
सर्वांना या औषधांचा उपयोग होतोच असं नाही. रिसर्च सांगतो की प्रयोगशाळेतील परिणाम आणि प्रत्यक्षात मिळणारे परिणाम यात थोडा फरक असतो. काही लोकांना साईड इफेक्ट्स होऊ शकतात, तर काहींसाठी ही किंमत परवडणारीच नाहीये.
ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे आणि व्यायाम करूनही त्याचे काहीच परिणाम दिसत नाहीत, त्यांच्यासाठी ही औषधं आशेचा नवा मार्ग ठरू शकतात. मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचे आहे.
वजन घटवण्यासाठी आता औषधांचाही पर्याय खुला झाला असला, तरी फक्त औषधं घेऊन वजन कायमचं कमी होणार नाही. त्यामुळे आहार, व्यायाम, झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट करणही तेवढंच महत्त्व आहे.
मौनजारो म्हणजे काय आणि ते वजन कमी करण्यात कसे मदत करते? (What is Mounjaro and how does it help in weight loss?)
→ मौनजारो ही एक इंजेक्शनद्वारे दिली जाणारी औषध आहे जी भूक कमी करून आणि ब्लड शुगर नियंत्रित करून वजन घटवते.
भारतामध्ये मौनजारोची किंमत किती आहे? (How much does Mounjaro cost in India?)
→ भारतात मौनजारो वापरण्याचा मासिक खर्च अंदाजे ₹14,000 ते ₹17,000 दरम्यान आहे.
वजन कमी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी मौनजारो योग्य आहे का? (Is Mounjaro suitable for everyone looking to lose weight?)
→ नाही, ही औषध सर्वांसाठी योग्य नाही; काहींना साइड इफेक्ट्स होऊ शकतात किंवा ही औषध परवडणार नाही.
वजन कमी करणाऱ्या इंजेक्शनसह आहार आणि व्यायाम करणं गरजेचं आहे का?(Do I still need to exercise and eat healthy while using weight loss injections?)
→ होय, ही औषधं प्रभावी ठरावी यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली राखणं महत्त्वाचं आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.