
थोडक्यात:
उपाशीपोटी फक्त साधं पाणी पिणं हे शरीरासाठी अत्यंत सोपं आणि प्रभावी आरोग्य उपाय आहे.
यामुळे चयापचय सुधारतो, शरीराला ऊर्जा मिळते आणि अनेक आजार टाळता येतात.
हे यकृत, किडनी आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.
How Drinking Water Empty Stomach In Morning Benefits Liver And Kidney Health: बरेचजण त्यांच्या दिवसाची सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीचे पाणी पिऊन करतात, जसे की मेथी दाण्याचे पाणी, बडीशेपचे पाणी किंवा लिंबू पाणी. पण तुम्हाला माहीत आहे का, सकाळी उपाशीपोटी फक्त साधे पाणी पिण्याचे आरोग्याशी निगडित अनेक फायदे आहेत.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे ही सर्वात सोपी आणि प्रभावी व आहे ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, चयापचय (metabolism) सुधारते आणि विविध आजार होण्याची शकता टळते. विशेषतः यकृत (Liver) आणि किडनीसाठी हे अतिशय फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया, उपाशीपोटी पाणी पिल्याने आरोग्यावर कोणते सकारात्मक परिणाम होतात.
चयापचय (Metabolism) सुधारते
रिकाम्या पोटी पाणी पिल्याने चयापचय (Metabolism) वाढते. त्यामुळे पचन सुरळीत होते आणि वजन कमी करायला देखील मदत होते.
किडनीचे शुद्धीकरण
किडनी शरीरातील विषारी घटक फिल्टर करण्याचे महत्त्वाचे काम करते. उपाशीपोटी पाणी प्यायल्याने किडनीला डिटॉक्स होण्यास मदत होते आणि ती अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकते.
त्वचेसाठी फायदेशीर
जेव्हा शरीर आतून स्वच्छ राहते, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसतो. सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते.
यकृत निरोगी राहते
डिहायड्रेशनमुळे यकृतावर ताण येतो आणि त्यामुळे त्याचे कार्य प्रभावित होते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने यकृत चांगल्या प्रकारे काम करते आणि त्यासंबंधी समस्या दूर होतात.
डोकेदुखीपासून आराम
अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) झाल्यामुळे सकाळी उठल्यावर डोके दुखते. उपाशीपोटी पाणी प्यायल्याने हा त्रास दूर होतो आणि डोके हलके वाटते.
शरीराला ऊर्जा मिळते
दिवसाची सुरुवात पाणी पिऊन केल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. यामुळे सकाळी सुस्ती येत नाही आणि उत्साह वाढतो. तसेच, मॉर्निंग सिकनेसचा त्रासही कमी होतो.
उपाशीपोटी पाणी प्यायल्याने चयापचय सुधारतो का? (Does drinking water on an empty stomach improve metabolism?)
होय, उपाशीपोटी पाणी प्यायल्याने चयापचय वाढतो आणि पचनतंत्र सुधारते, ज्यामुळे वजन नियंत्रणास मदत होते.
सकाळी पाणी प्यायल्याने किडनीला फायदा होतो का? (Is drinking water in the morning good for kidney health?)
होय, पाणी किडनीतील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि तिचे कार्य चांगले राहते.
उपाशीपोटी पाणी त्वचेसाठी उपयोगी ठरते का? (Is drinking water on an empty stomach beneficial for the skin?)
होय, शरीर स्वच्छ राहिल्यास त्वचेवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि त्वचा उजळ आणि तजेलदार दिसते.
सकाळी पाणी प्यायल्याने थकवा आणि डोकेदुखी कमी होते का? (Can morning water intake reduce fatigue and headaches?)
होय, उपाशीपोटी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनमुळे होणारी डोकेदुखी कमी होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.