

PNEUMONIC PLAGUE
sakal
WHAT IS PNEUMONIC PLAGUE AND HOW DOES IT SPREAD: रशियातील सायबेरियामधील अँटी-प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूट (Anti-Plague Research Institute) मध्ये काम करणाऱ्या २८ वर्षीय लॅब टेक्निशियनचा न्यूमोनियासारख्या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीला झालेला न्यूमोनिया नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नसल्याने न्यूमोनिक प्लेगची शक्यता चर्चेत आली आहे. मात्र, संबंधित व्यक्तीला न्यूमोनिक प्लेगच झाला होता, असे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
प्लेग हा यर्सिनिया पेस्टिस (Yersinia pestis) नावाच्या जिवाणूमुळे होणारा गंभीर संसर्गजन्य आजार आहे. हा जिवाणू प्रामुख्याने उंदीर आणि इतर लहान प्राण्यांमध्ये आढळतो. संक्रमित पिसू चावल्यामुळे माणसाला प्लेगची लागण होऊ शकते.