Sinus Problem : सायनसचा त्रास होतो म्हणजे नेमकं काय होतं ?

श्लेष्मा आत अडकल्यानंतर सायनसच्या आतील दाब वाढतो ज्यामुळे वेदना होतात. त्यामुळे बहुतेक रुग्ण डोकेदुखीची तक्रार करतात, ज्याचे स्थान सायनसच्या स्थानावर अवलंबून असते.
Sinus Problem
Sinus Problemgoogle
Updated on: 

मुंबई : आपण आपल्या आजुबाजुला अनेकदा ऐकतो की मला सायनयचा त्रास आहे. खरं तर हे विधान चुकीचे ठरते कारण सायनस हे आपल्या नाकामध्ये आणि त्याच्या सभोवतालची एक सामान्य रचना आहे जी प्रत्येक मनुष्यामध्ये असते.

सायनसची उपस्थिती हा काही त्रास म्हणता येणार नाही. नाकाच्या दोन्ही बाजूला तसंच डोळ्याच्या खोबणीच्या वर, कवटीच्या हाडामध्ये असलेल्या पोकळ जागांना सायनसेस म्हणतात. या पोकळ जागांमधील अंतःत्वचेला दाह होणं याला सायनसायटिस म्हटलं जातं.

या आजाराचं मुख्य कारण विषाणूजन्य सर्दी. सायनसविषयी असलेल्या काही समज-गैरसमजांविषयी सांगत आहेत मेडिकव्हर हॉस्पीटल्सचे ईएनटी आणि एंडोस्कोपिक सायनस सर्जन डॉ राजेंद्र वाघेला.

Sinus Problem
Fungal Sinusitis : नाकात होणारा छोटासा संसर्ग मेंदूसाठी ठरेल घातक

सायनुसायटिसची लक्षणे

श्लेष्मा आत अडकल्यानंतर सायनसच्या आतील दाब वाढतो ज्यामुळे वेदना होतात. त्यामुळे बहुतेक रुग्ण डोकेदुखीची तक्रार करतात, ज्याचे स्थान सायनसच्या स्थानावर अवलंबून असते.

उदाहरणार्थ, फ्रन्टल सायनुसायटिसमध्ये भुवयांवर वेदना, मॅक्सिलरी सायनुसायटिसमध्ये गालाच्या हाडांवर वेदना, स्फेनोइड सायनुसायटिसमध्ये डोक्याच्या अगदी मध्यभागी किंवा डोक्याच्या मागच्या बाजूला वेदना आणि एथमॉइड सायनुसायटिसमध्ये डोळ्याभोवती वेदना.

इतर लक्षणांमध्ये चेहरा आणि डोके बधीर होणे, खाली वाकल्यावर चक्कर येणे किंवा डोके जड होणे, घशाच्या मागील बाजूस कफ येणे (नाकातून थेंब झाल्यानंतर), तीव्र सर्दी, दुर्गंधी किंवा कधीकधी रक्ताचा नाकातून स्त्राव, चोंदलेले किंवा बंद नाक यांचा समावेश आहे.

सायनुसायटिसचे कारण समजून घेणे आणि त्यांचा प्रभावीपणे उपचार करण्यासाठी ते ओळखणे महत्त्वाचे आहे. कारण हे सर्दीमुळे होऊ शकते किंवा त ट्यूमर किंवा कर्करोग तसेच नाकातील बुरशी संसर्गामुळे होणारे दुय्यम सायनुसायटिस असू शकते.

Sinus Problem
Monsoon infections : फंगल इन्फेक्शन झाल्यास काय काळजी घ्याल ?

सायनुसायटिसचे दोन प्रकार आहेत यामध्ये बॅक्टेरीयल सायनुसायटीस, ऍलर्जीक/ क्रॉनिक सायनुसायटिस.ऍलर्जीक/ क्रॉनिक सायनुसायटिस

ऍलर्जी हे वैद्यकीय थेरपीद्वारे प्रभावीपणे व्यवस्थापित केले जाऊ शकते. मात्र, अनेक वेळा सायनसची शस्त्रक्रिया करावी लागते. सायनस सर्जरी (FESS- फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी) ही अनेक सायनस समस्यांवर उपचार करण्यासाठी एक प्रभावी पद्धत म्हणून ओळखली जाते.

काही महत्त्वाच्या टिप्स:

- धुम्रपान टाळा कारण यामुळे सायनस यंत्रणेवर विपरित परिणाम होतो.

- स्टीम इनहेलेशनचा वापर करा : विशेषतः जेव्हा नाक चोंदलेले असेल आणि नाकातून घट्ट स्त्राव होत असेल.

- सायनस रिन्सिंगची जुनी पद्धत (“जल-नेति”) ही सायनसच्या समस्यांना तोंड देण्यासाठी एक प्रभावी पद्धत आहे.

- चार आठवड्यांपेक्षा जास्त काळ लक्षणे आढळल्यास किंवा खालील लक्षणांशी संबंधित असल्यास ताबडतोब कान, नाक, घसाविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

- नाकातून रक्त येणे

- डोळ्यांभोवती अचानक वेदना झाल्यास किंवा डोळ्यांना सूज आल्यास ,दृष्टी कमी झाल्यास.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com