White Salt Disadvantages : सॅलडमध्ये पांढऱ्या मिठाचा वापर धोक्याचा...

सॅलडसाठी काळ्या मिठाचा वापर करावा, असे निरीक्षण आहार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
 White Salt Disadvantages
White Salt Disadvantagesesakal

डॉ. रेणुका माईंदे -

प्रक्रिया केलेले पदार्थ, त्यातील अमर्याद साखर, मीठ, तेल, तूप आणि मेदयुक्त पदार्थांमुळे माणूस खादाड झाला आहे. माणसाला लागणाऱ्या या भूकेचे मूळ पोटात नसते तर ते मेंदूत असते. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात सॅलड वापरतो.

सॅलड आरोग्यासाठी चांगले मानले जाते. ग्रीन सॅलडमध्ये टोमॅटो, कांदा, कोबी, ब्रोकोली, काकडी अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश केला जातो. यात कॅलरी कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे. कॅलरीज कमी असल्याने शरीराचे वजन वाढत नाही. मात्र सॅलडची चव वाढवण्यासाठी पांढऱ्या मिठाचा वापर शरीरासाठी नुकसानदायी आहे. सॅलडसाठी काळ्या मिठाचा वापर करावा, असे निरीक्षण आहार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

सॅलडमध्ये मीठ खाण्याचे तोटे

पचनक्रियेवरही परिणाम होतो.

शरीरात कॅल्शिअमची कमतरता होते.

सांधेदुखीचा त्रासही होतो.

झोप न लागणे, अस्वस्थता ही लक्षणे दिसतात.

सॅलडवर मीठ खाल्ल्यास पाचक एन्झाईम्स खराब होतात.

भाज्यांमध्ये नैसर्गिक क्षार

भाज्यांमध्यै नैसर्गिक क्षार असतात. तेलाचा उपयोग वाढला, तेव्हापासून मिठाचा उपयोग वाढला आहे. अधिक तेलासोबत अधिक मिठाचा वापर होऊ लागला. मीठ मिरचीचा ठेचा, चटणी यासारखे अति तिखट व मिठाचे प्रमाण जास्त असलेले मसालेदार, स्पायसी पदार्थ, ब्रेड व इडली डोशासारखे आंबवलेले (फार्मेंटेड) खाद्यपदार्थ रक्त आणि पित्त दोन्हीला दूषित करतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यात वरून मीठ खाण्याची चुकीची सवय नडते. मात्र मर्यादित मिठाचा वापर शरीरासाठी आवश्यक आहे.

 White Salt Disadvantages
Carrot Salad : थंडीत उपयुक्त अशी आजी स्टाईल टेस्टी गाजराची कोशिंबीर! नक्की ट्राय करा

अधिक मीठ खाण्याने होणारे आजार

उच्च रक्तदाब

पोटाचा कॅन्सर

किडनीचे आजार

हृदयविकार

याकडे लक्ष द्या…

भात आणि चपातीमध्येही मीठ घालू नका.

स्वयंपाक करताना मीठ सर्वात शेवटी टाका.

जेवणात कधीही वरून मिठाचा वापर करू नये.

सॅलेडमध्ये चाट मसाला वापरल्यास मीठ नकाे

सॅलेडमध्ये मिठाऐवजी लिंबाचा रस घाला (salad)

 White Salt Disadvantages
Cucumber Salad : धक्कादायक! काकडीमध्ये सलादचे घटक सर्वाधिक कमी, एक्सपर्टचा दावा

जेवणाच्या ताटात मीठ वाढून घेऊ नका

सॅलडवर मीठ टाकून खाल्ल्याने शरीरातील सोडियमची पातळी वाढते. जागतिक आरोग्य संघटनेने रोजच्या आहारा केवळ एक चमचा अर्थात पाच ग्रॅम मिठाचे सेवन करावे. मिठाची आहारात वाढ झाल्यास उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते. पांढऱ्या मिठामुळे होणारे नुकसान टाळायचे असेल तर सॅलडमध्ये काळे मीठ आणि सैंधव मिठाचा वापर करता येतो. दोन्ही प्रकारच्या मिठात सोडियम कमी प्रमाणात असते. सैंधव मीठ चवीनुसार छान असते.

-डॉ. रेणुका माईंदे, आहार तज्ज्ञ नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com