Egg White कि Egg Yolk अंड्याचा नेमका कोणता भाग आरोग्यासाठी चांगला?

अंड किंवा अंड्याचे वेगवेगळे पदार्थ सर्वच आवडीने खात असले तरी एक प्रश्न अनेकांच्या मनात कायम असतो तो म्हणडे अंड्याचा बलक आरोग्यासाठी चांगला की अंड्याचा पांढरा भाग म्हणजेच Egg White.
अंड्याचा कुठला भाग चांगला
अंड्याचा कुठला भाग चांगलाEsakal

अंड हे एक प्रकारचं सुपरफूड मानलं जातं. प्रोटीनचं स्त्रोत असलेल्या अंड्याला Eggs अनेकजण आपल्या डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करत असतात. Health Tips Marathi Which Part of the egg is more beneficial white or yellow

दिवसाची सुरुवात करण्यासाठी अंड हा नाश्त्यासाठी Breakfast एक उत्तम पर्याय आहे. प्रोटीनसोबतच Protein अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि इतर अनेक मायक्रोन्यूट्रियंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळेच अंड्याच्या सेवनामुळे शरीरासोबतच मेंदूचं आरोग्य Brain Health चांगलं राहण्यासाठी देखील मदत होते.

अनेकजण प्रोटीनसाठी आपल्या डाएटमध्ये Diet उकडलेल्या अंड्याचा समावेश करत असतात. अंड्याचे अनेक पदार्थ हे अत्यंत कमी वेळेत बनत असल्याने अनेकजण अंड्याचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ नाश्त्यासोबत दिवसभराच्या वेगवेगळ्या वेळी समाविष्ट करत असतात. ऑमलेट, भुर्जी, अंडा करी, अंडा बिर्याणी अशा वेगवेगळ्या स्वरुपात अंड खाणं अनेकजण पसंत करतात.

अंड किंवा अंड्याचे वेगवेगळे पदार्थ सर्वच आवडीने खात असले तरी एक प्रश्न अनेकांच्या मनात कायम असतो तो म्हणडे अंड्याचा बलक आरोग्यासाठी चांगला की अंड्याचा पांढरा भाग म्हणजेच Egg White.

वर्कआऊट करणारे किंवा वजन कमी करण्यासाठी अनेकजण अंड खात असताना त्याता पांढऱा भाग खातात आणि पिवळा फेकून देतात. तर काहींना मात्र पिवळा भाग Egg Yolk म्हणजेच अंड्याच बलक खाण्याचा सल्ला दिला जातो. तेव्हा जाणून घेऊयात अंड्याचा कोणता भाग खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे.

हे देखिल वाचा-

अंड्याचा कुठला भाग चांगला
Raw Egg Side Effects : कच्चे अंडे खाण्याचं नवं फॅड आलंय? त्याचे तोटेही जाणून घ्या, मग निर्णय घ्या! 

अंड्याचा पांढरा भाग Egg White

अनेकजण अंड्याचा केवळ पांढऱा भाग खाणं पसंत करतात. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये फॅटस् नसल्याने आणि अत्यंत कमी कॅलरी असल्याने वजन कमी करण्यासाठी एग व्हाइट जास्त उपयुक्त ठरतं. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं.

एग व्हाइटमध्ये ९० टक्के पाणी तर १० टक्के प्रोटीन आढळतं. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये कोलेस्ट्रॉल नसल्याने हृदयाची समस्या असलेल्यांसाठी एग व्हाइटचं सेवन अधिक उपयुक्त मानलं जातं. यात फॅट्स प्रमाणाही नसून खराब कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी मदत होते.

एग व्हाइटमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यास मदत होते.

अंड्याच्या पांढऱ्या भागातील पोषक तत्वांमुळे आणि प्रोटीनमुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते.

अंड्याच्या पांढऱ्या भागात आढळणाऱ्या रायहोफ्लेविन विटामिनमुळे मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास दूर होण्यास मदत होते.

एग व्हाइटमध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते तसचं अशक्तपणा दूर करण्यासाठीही एग व्हाइटचं सेवन फायद्याचं ठरतं.

अशा प्रकारे अंड्याच्या पांढऱ्या भागाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

अंड्याचा पिवळ भाग Egg Yolk

अंड्याच्या पिवळ्या भागात म्हणजे बलकामध्ये पांढऱ्या भागाच्या तुलनेत अधिक पोषक तत्व आढळतात. अंड्याच्या बलकामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी12, तसचं व्हिटॅमिन ए, डी, इ आणि अनेक पोषत तत्व मोठ्या प्रमाणात आढळतात.

तसंच यात कॅल्शियम, मॅग्नेशिय आणि सेलेनियम आढळतं. संपूर्ण अंड्यापैकी जवळपास ९० टक्के पोषक तत्वही बलकामध्ये आढळतात. असं असलं तरी बलकांच योग्य प्रमाणात सेवन न केल्यास काही तोटेही होवू शकतात.

अंड्याच्या बलकामध्ये कॅलरीज प्रमाण जास्त असतं. बलकामध्ये ५५ टक्के कॅलरीज आढळतात तर एग व्हाइटमध्ये १७ टक्के कॅलरी आढळतात.

तसंच बलकामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं. यामुळे बलकाचं जास्त सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होऊ शकते.

बलकामध्ये फॅट्स असल्याने वजन वाढू शकतं.

हे देखिल वाचा-

अंड्याचा कुठला भाग चांगला
Egg Biryani Recipe : अंडा बिर्याणी बनवण्याची याहून सोप्पी पद्धत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल?

अंड्याचा नेमका कोणचा भाग खावा.

अंड्याचा पांढरा भाग हा आरोग्यासाठी चांगला आहे. मात्र याच्या अतिसेवनाने देखील अपचन आणि गॅसचा त्रास होवू शकतो. तर पिवळ बलक अत्यंत हेल्दी असलं तरी अनेक तोटे देखील आहेत. यामुळे अनेक तज्ञ योग्य प्रमाणातमध्ये संपूर्ण अंड खाण्याचा सल्ला देतात.

मात्र जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी किंवा व्यायामासाठी अंडं जास्त प्रमाणात खायचं असेल तर अशावेळी अंड्याचा पांढरा भाग खाणं जास्त योग्य मानलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com