पुरुषांपेक्षा स्त्रियांचं वजन कमी होणं अवघड? जाणून घ्या सत्य… |Healthy lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weight loss

पुरुषांपेक्षा स्त्रियांचं वजन कमी होणं अवघड? जाणून घ्या सत्य…

हल्ली प्रत्येकजण वजन कमी करण्यासाठी वाट्टेल ते उपाय करतात. कधी जीम तर कधी व्यायाम, योगा, तर कधी डाइट पण अनेकदा याचा फायदा होत नाही. वजन कमी करण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात.

आपली जीवनशैली किंवा शिस्त अनेकदा वजन कमी करण्यास मदत करते पण आम्ही तुम्हाला म्हटले की लिंगानुसारही वजन कमी करण्याचा वेगवेगळा प्रभाव पडतो. हो हे खरंय. स्त्रियांना पुरुषांपेक्षा वजन कमी करणे जास्त आव्हानात्मक वाटू शकते.

हेही वाचा: पावसाळ्यातील आजारांपासून काळजी घेणे आवश्यक

न्यूट्रिशनिस्ट भक्ती कपूर यांच्या मते,स्त्रीला काही किलो वजन कमी करण्यासाठी अनेक धडपड करावी लागते. तर पुरुष हे सहजतेने करू शकतात. कपूरने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तीन बाबींवरुन याबाबत सविस्तरपणे सांगितले.

1. कमी टेस्टोस्टेरॉन: कमी टेस्टोस्टेरॉनमुळे वजन कमी करणे कठीण होते. टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट इंजेक्शन्स घेतलेल्या पुरुषांचा 11 वर्षांपर्यंत अभ्यास केला त्यात त्यांनी शरीराचे वजन सरासरी 20 टक्के कमी झाले.

हेही वाचा: सध्या कोरोनाची लाट नाही; अभ्यासकांचा दावा

2. शरीर रचना: पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा कमी चरबी असते तर स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त चरबी असते. पुरुषांना ट्रंक आणि पोटाच्या आसपास ऍडिपोज टिश्यू जमा होण्याची अधिक शक्यता असते, तर महिलांचे ऍडिपोज टिश्यू सामान्यतः नितंब आणि मांड्यांभोवती आढळतात.


3. हार्मोनल चढउतार: हार्मोन्स शरीरातील वेगवेगळ्या क्रिया किंवा कार्यांसाठी जबाबदार असतात, ज्यामध्ये स्नायूंची चरबी कंट्रोल करणे,हार्मोनल नेहमी संतुलीत असायला हवे. दर हार्मोनल संतुलीत नसेल तर वजन कमी करणे अधिक कठीण होते.

Web Title: Why It Is More Difficult To Loss Weight For Women Than Men

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top