Why Do People Sleep Talk? | Surprising Factors Explained
sakal
Sleep Health News Marathi: आपल्या ओळखीत असे बरेचजण असतील ज्यांना रात्री झोपेत बोलण्याची सवय असते. एखाद्याच्या तोंडून रात्री झोपेत अचानक शब्द, वाक्यं किंवा गोंधळलेले आवाज ऐकू आले तर अनेकांना ते मनोरंजक, गमतीशीर किंवा त्रासदायक वाटू शकतं. पण ही खरंच सवय आहे का? की एखादी वैज्ञानिक अवस्था ज्यामुळे काही लोक झोपेत बडबड करतात... तज्ज्ञांच्या मते, सुमारे दोनपैकी एक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधी झोपेत बोलतेच.
आपल्याला असं वाटतं की झोपेत बोललं की काही गुपितं उघड होतात. पण असं नाहीये; वास्तवात झोपेत बोलणं हे ती व्यक्ती झोपेच्या कोणत्या टप्प्यात आहे त्यावर अवलंबून मेंदू आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांशी संबंधित काही प्रतिक्रिया किंवा आवाज व्यक्त करू शकतो. हे हानिकारक नसलं तरी बऱ्याचदा इतर झोपेशी संबंधित विकारांचे संकेत असू शकते.