Wolf Hour: तुम्हालाही रोज पहाटे ३-५ च्या दरम्यान जाग येते? मग शरीर देत असलेल्या या सिक्रेट सिग्नल्सकडे दुर्लक्ष करू नका

Why does one wake up every day at 3 AM and can't go back to sleep: रोज पहाटे ३ ते ५ दरम्यान जाग येते? हा केवळ योगायोग नाही, तुमचं शरीर काही सांगू पाहतंय!
Why does one wake up every day at 3 AM and can't go back to sleep
Why does one wake up every day at 3 AM and can't go back to sleepsakal
Updated on

थोडक्यात:

  1. पहाटे ३ ते ५ दरम्यान झोपेतून वारंवार जागं होणं ही एक सामान्य पण लक्ष देण्यासारखी लक्षणं असू शकतात.

  2. या वेळेत शरीरात होणारे बदल आणिअस्वस्थपणा अधिक तीव्र होतो.

  3. ही झोपमोड फक्त इन्सोम्निया किंवा चुकीच्या झोपेच्या सवयीमुळेच होत नाही, इतर काही कारणंही जबाबदार असतात.

Connection Between Cortisol and Early Morning Wakefulness: बऱ्याचदा असं होतं की रात्री शांत झोप लागलेली असते पण पहाटे ३-५ च्या सुमारास अचानक झोपेतून जाग येते. बहुतेक वेळी तर पुन्हा झोपही लागत नाही. डोक्यात विचारचक्र सुरु होतं. तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचं शरीर तुम्हाला काही सिक्रेट पण गंभीर सूचना देत असू शकतं.

अनेकवेळा वुल्फ अवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काळात शरीरात भावनिक आणि हार्मोनल बदल होत असतात. या काळात मनातील अस्वस्थपणा जास्त तीव्र असतो. पण याला कारणीभूत फक्त इन्सोम्निया किंवा चुकीच्या झोपेच्या पोझिशिअनमुळे नाही, तर यामागे इतर काही कारणं देखील जबाबदार असतात.

काय आहे वुल्फ यावर ?

वुल्फ यावर म्हणजे पहाटे ३ ते ५ दरम्यानची वेळ. या वेळेला पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून अस्वस्थता, भावनिक अस्थैर्य आणि असुरक्षिततेशी जोडला गेलेला आहे.

तुम्ही एकदम गाढ झोपेत असताना देखील मन चंचल असते. काही लोकांना का वेळेत भीतीदायक स्वप्नं पडतात किंवा अचानक चिंता आणि मानसिक बैचैनी जाणवते. तर काही लोकांसाठी हा काळ 'स्पिरिच्युअल अवेकनिंग' सारखा असतो.

Why does one wake up every day at 3 AM and can't go back to sleep
Bypass Surgery Myths Busted: बायपास सर्जरीचं नाव ऐकताच काळजात धडधडतं? मग हे एकदा वाचाच!

तज्ज्ञ काय सांगतात ?

तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही दररोज ३ ते ४ च्या सुमारास झोपेतून उठता आणि पुन्हा झोप लागत नसेल, तर हा धोक्याचा इशारा समजला पाहिजे.

रात्री झोपताना शरीर अनेक स्लीप सायकल्समधून जातं. यात मधूनच जागं होणं सामान्य आहे, पण काही सेकंदातच पुन्हा झोप येते. पण जर हे सतत आणि दीर्घकाळ घडत असेल, तर त्यामागे इतर आरोग्यविषयक कारणं असू शकतात.

झोपेत अडथळा येणाची प्रमुख कारणं

ताणतणाव आणि चिंता

दिवसभर मनात दाबून ठेवलेल्या नकारात्मक भावना आणि विचार रात्री डोकं शांत होतांच पुन्हा डोकं वर काढतात. त्यामुळे मेंदू सतत चालू राहतो. परिणामी झोप नीट लागत नाही किंवा रात्री अचानक जाग येते.

हार्मोनल असंतुलन

ताण तणावामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन होतं, त्यातही कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतं. हे देखील एक कारण आहे ज्यामुळे पहाटे झोप मोड होते.

Why does one wake up every day at 3 AM and can't go back to sleep
Biotin Rich Foods For Hair Growth: केस गळणे थांबतच नाहीये? आहारात 'या' 5 गोष्टी समाविष्ट करा; लगेत दिसेल फरक!

सर्केडियन रिदममध्ये बिघाड

झोपण्याच्या बदलत्या वेळा, दिवसभर पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे किंवा वारंवार होणारा वेळेतला बदल, जसेकी सतत लांबचा प्रवास करणे; यामुळे शरीराचं नैसर्गिक घड्याळ बिघडतं ज्यामुळे झोपेचं गणित बिघडतं. यालाच सर्केडियन रिदममधधील बिघाड म्हणतात.

भावनिक अस्वस्थता आणि विचित्र स्वप्न

या वेळेत कधी कधी भीती वाटणारी स्वप्नं पडू शकतात किंवा मनात खोल कुठे तरी अस्वस्थपणा जाणवतो, ज्यामुळे झोपमोड होते आणि पुन्हा झोप येणं कठीण होतं.

चांगल्या झोपेसाठी या सवयी करतील मदत

ध्यान आणि मनःशांती

रोज सकाळी १० मिनिटे प्राणायाम, योग किंवा ध्यान करा. यामुळे मन शांत राहतं आणि तणाव कमी होतो.

झोपेची नियमित वेळ ठरवा

रोज एकाच वेळी झोपा आणि उठा. यामुळे तुमच्या शरीराला एकाच वेळेस झोपायची आणि उठायची सवय होते.

Why does one wake up every day at 3 AM and can't go back to sleep
Heart Attack in Kids: लहान मुलांना खरंच हार्ट अटॅक येतो का? तज्ज्ञ सांगतात...

मोबाईल/ टीव्हीपासून दूर राहा

रात्री झोपण्याच्या १ तास आधी स्क्रीन टाळा. ब्लू लाइटमुळे मेलाटोनिन निर्मिती थांबते.

मद्यपान आणि कॅफिन टाळा

रात्रीच्या वेळेस यांचे सेवन झोपेवर वाईट परिणाम करते.

FAQs

  1. रोज पहाटे ३ ते ५ वाजता उठणं नॉर्मल आहे का? (Is waking up between 3 to 5 am every day normal?)
    कधी कधी झोपेतून उठणं सामान्य आहे, पण जर दररोज एकाच वेळेला जाग येत असेल आणि पुन्हा झोप लागत नसेल, तर ते शरीर किंवा मनाच्या असंतुलनाचं लक्षण असू शकतं. त्यामुळे दुर्लक्ष न करता कारण शोधणं आणि योग्य उपाय करणं गरजेचं आहे.

  2. वुल्फ अवर म्हणजे नेमकं काय असतं? (What exactly is the Wolf Hour?)
    वुल्फ अवर म्हणजे पहाटे ३ ते ५ या वेळेतील कालखंड. या वेळी झोप खोल असते, पण मनात भावनिक अस्वस्थता आणि चिंता अधिक तीव्र होण्याची शक्यता असते. काही संस्कृतींमध्ये या वेळेला आध्यात्मिक किंवा नकारात्मक ऊर्जा जागृत असते असं मानलं जातं.

  3. झोपेचं नैसर्गिक घड्याळ म्हणजे काय आणि ते कसं बिघडतं? (What is the body's natural clock and how does it get disrupted?)
    आपल्या शरीरात एक नैसर्गिक वेळापत्रक असतं, ज्याला सर्केडियन रिदम म्हणतात. झोपायची वेळ वारंवार बदलणं, पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणं किंवा सतत लांब प्रवास करणं यामुळे हे वेळापत्रक बिघडतं, आणि त्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते.

  4. या समस्येवर घरगुती उपाय काय करू शकतो? (What home remedies can help with this issue?)
    रोज ठराविक वेळेला झोपणं आणि उठणं, झोपण्याआधी स्क्रीनपासून दूर राहणं, ध्यान-प्राणायाम करणं, कॅफिन आणि मद्यपान टाळणं — हे सर्व उपाय झोप सुधारण्यास आणि शरीराचं संतुलन राखण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. स\काळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com