जागतिक मधुमेह दिन : मधुमेहाचा फास भारता भोवती वाढत आहे. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai , Health
जागतिक मधुमेह दिन : मधुमेहाचा फास भारता भोवती वाढत आहे.

जागतिक मधुमेह दिन : मधुमेहाचा फास भारता भोवती वाढत आहे.

मुंबई : मधुमेह (Diabetes) टाळण्यासाठी जिवनशैली महत्वाची आहे त्याच बरोबर मधुमेह झाल्यावर औषधां बरोबरच चांगली जिवनशैली आवश्‍यक आहे. मुंबई (Mumbai) महानगर पालिकेने 488 खुल्या ठिकाणी व्यायामाची साधने उपलब्ध करुन दिली असून.बहुतांश उद्यानांमध्ये जॉगिंग ट्रॅक,पदपथ,योगा ध्यानधारणा केंद्र उपलब्ध आहेत.

मधुमेहाचा फास भारता भोवती वाढत आहे.वयस्कर व्यक्तींना होणार आता लहान मुले तरुणांमध्येही आढळू लागला आहे.प्रामुख्याने श्रीमंताचा आजार म्हणून मधुमेहाची ओळख होती.मात्र,गेल्या दिड दोन दशकात कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमध्येही मधुमेहाचे रुग्ण आढळू लागले आहेत.

जगभरात 2021-22 या कालावधीत "ऍसेस टू डायबिटीक केअर'या संकल्पनेवर आधारीत मधुमेहाच्या रुग्णांना विविध सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून मधुमेह संदर्भात व्यापक जनजागृती करून मधुमेह ग्रस्त रुग्णांना निरनिराळ्या वैद्यकीय सेवा दिल्या जातातच.त्याच बरोबर आता प्रत्येक प्रभागात मधुमेह क्‍लिनीक सुु करण्यात येणार आहे. तसेच उद्यान विभागही यामध्ये महत्वाचे योगदान देत आहे.मधुमेहाची लक्षणे दिसू लागताच जागरूक होऊन आवश्‍यक ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य आहारासोबत नेटकी जीवनशैली व दिनचर्या तसेच दररोज चालणे, धावणे यासह वैद्यकीय तज्ञांनी सुचवलेले व्यायाम करणे हे महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा: World Diabetes Day 2021 : ब्लड प्रेशरची औषध मधुमेहासाठी फायदेशीर; संशोधनाचा निष्कर्ष

मुंबईच्या भौगोलिक मर्यादांमुळे प्रत्येकाला व्यायामाच्या सेवा-सुविधा मिळतातच, असे नाही. अशा स्थितीत पालिका प्रशासनाने उद्यान विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सर्व परिसरांमध्ये उद्याने, खेळाची मैदाने, मनोरंजन मैदाने यांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे.तसेच या सेवेत वाढ करण्याचे निर्देश अतिरीक्त आयुक्त अश्‍विनी भिडे यांनी दिले आहेत. महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या 1 हजार 68 भुखंडापैकी 488 ठिकाणी व्यायामाची उपकरणे लावण्यात आली आहेत.

हेही वाचा: RBI च्या नव्या 2 योजनांचा सामान्य नागरिकांना 'असा' होणार फायदा

नागरिकांना सकाळ-सायंकाळ चालणे, धावणे यासारखे आरोग्यदायी फायदे विनामूल्य व घराजवळ सहजरित्या उपलब्ध झाले पाहिजेत. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्‍चिम उपनगरे अशा तीन विभागांमध्ये सर्वत्र या सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील, याकडे लक्ष दिले जात आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

loading image
go to top