World Egg Day : फक्त प्रोटीनसाठीच नव्हे तर अंडी खाण्याचे आहेत एवढे आरोग्यदायी फायदे

अंड्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, फॉस्फोरस, सेलेनियम, कॅल्शियम, झिंक, हेल्दी फॅटसह अनेक आवश्यक तत्व असतात
World Egg Day
World Egg Dayesakal

World Egg Day : अंडी आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. यात नॅचरल मल्टिव्हिटॅमिन्स असतात. सूपरफुडमध्ये सगळ्यात वरच्या यादीत येतात ती अंडी. मात्र अंड्याचे हे काही फायदे फार कमी लोकांना माहितीये. चला तर जाणून घेऊया अंड्याचे काही फायदे.

अंड्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, फॉस्फोरस, सेलेनियम, कॅल्शियम, झिंक, हेल्दी फॅटसह अनेक आवश्यक तत्व असतात. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते जे हृदयासाठी फायद्याचे असते.

अंड्याचे फायदे

१) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते - तुम्हाला आश्चर्य वाटेल की अंड्यांमध्ये जास्त कोलेस्ट्रॉल असते तरी अंडी शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीरात वाढवत नाही. हेल्थलाइनच्या माहितीनुसार ७० टक्के लोकांमध्ये अंडी कोलेस्ट्रॉल वाढवत नाही. फक्त ज्यांना हायपोकोलेस्ट्रॉलेमिया आहे अशांमध्ये अंड्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. अशांनी अंड्याचे सेवन कमी करावे.

२) गुड कोलेस्ट्रॉल वाढवते - अंडी शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढवते. ज्या लोकांमध्ये गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते त्यांच्यात हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इतर हार्ट डिसीजचा धोका कमी असतो.

World Egg Day
Egg Side Effects : दररोज अंडी खाऊ नका; साइड इफेक्ट वाचाल तर...

३) कोलिन - फार कमी लोकांना माहितीये की अंड्यामध्ये कोलिन नावाचा कंपाउंड असतो. बहुतांश लोकांमध्ये कोलिनची कमतरता असते. कोलिन सेल मेंब्रेनचे उत्पादन करते. मेंदूला सिग्नल देणाऱ्या मॉलिक्यूलच्या उत्पादनात कोलिन महत्वाची भूमिका बजावते. कोलिनच्या कमतरतेमुळे मसल्स डॅमेज होतात. सोबतच हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

World Egg Day
Egg Biryani Recipe : अंडा बिर्याणी बनवण्याची याहून सोप्पी पद्धत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल?

४) अमिनो अॅसिड - अंड्यामध्ये आवश्यक अमिनो अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. अंडी खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. तसेच हाडेदेखील मजबूत होतात.

५) किसलेल्या अंड्याचे सेवन करू नका - बंगळूरचे चीफ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्त डॉ. प्रियंका रोहतगी सांगतात की, अंडी प्रमाणात खाल्ल्यास नुकसान होत नाही. मात्र ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी अंडी जास्त प्रमाणात खाऊ नये. सामान्य लोकांना रोज आहारात एक ते दोन अंडी खावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com