World Thalassemia Day : म.फुले आरोग्य योजना वाचवेल हजारो रक्तआजारच्या बालकांचे प्राण, पण मंजुरी कधी?

महाराष्ट्रातील हजारो रक्तआजारात सापडलेली बालके या आदेशाने मृत्युशी त्यांची झूंज थांबणार आहे
World Thalassemia Day
World Thalassemia Day esakal

World Thalassemia Day : थॅलेसिमिया व इतर रक्त आजाराच्या उपचारासाठी बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट शस्त्रक्रियेचा उपचार समोर आला असून महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत शस्त्रक्रियेचा समावेश केल्यास शेकडो बालकांना नवे जीवन मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रातील हजारो रक्तआजारात सापडलेली बालके या आदेशाने मृत्युशी त्यांची झूंज थांबणार आहे.

थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल ॲनिमिया, ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), अप्लास्टिक ॲनिमिया, प्युअर रेडसेल अप्लासिया, कॅन्सर यासारख्या रुग्णांच्यामध्ये घट न होता दिवसे दिवस वाढ होत आहे.

मुख्य म्हणजे अनुवांशिकतेतून आलेल्या रक्ताचे आजारात प्रामुख्याने लहान बालके आहेत. सतत रक्तपेढीतून रक्त देणे, रक्ताचे घटक पुरवणे या सारखे उपचार या आजारांसाठी केले जात आहे. या उपचाराला मर्यादा असतात. तसेच अनेक वेळा त्यात खंड पडणे, पालकांची आर्थिक स्थिती वाईट असल्याने उपचार न होणे, शासकीय रुग्णालयात डे केअर सेंटरच्या सेवा न मिळणे या प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जात ही रोगग्रस्त बालके मृत्यूशी संघर्ष करत आहेत. औषधाअभावी अनेकांना मृत्यू येतो.

या पार्श्वभूमीवर, बोन मॅरो ट्रान्स्प्लांट हा एक अस्थी मज्जा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेने आजारातून मुक्त होत बालके व रुग्णांना जीवनदान मिळू शकते. पण या शस्त्रक्रियेचा खर्च खूप अधिक आहे. शासनाने महात्मा फुले आरोग्य योजनेत या आजाराच्या रुग्णांचा शस्त्रक्रियेचा खर्च समाविष्ट करण्याची गरज आहे.

या रुग्णांना मोफत रक्त देण्याचा नियम असून देखील तो पाळला जात नाही. त्याचा फटका पालकांना बसतो.

World Thalassemia Day
Symptoms Of Blood Cancer : 'ही' लक्षणं सांगतात तुमच्या शरीरात वाढताय ब्लड कँसरचे विषाणू

जनतेला शासनाकडून आहेत या अपेक्षा, करताय 'या' मागण्या

- मदतीची पालकांना अपेक्षा.

- मोफत रक्त देण्याचा नियम पाळावा.

- गर्भवती मातांना आजारी बालके जन्माला येऊ नयेत यासाठी योग्य सल्ला देण्याबाबत जागरूकता हवी.

- मुलांच्या योग्य उपचारासाठी सीबीसी, फेरिटीन, व शारीरिक तपासण्या कराव्यात.

- आनुवंशिक आजारी मुले जन्माला येवू नये म्हणून गर्भाशयातील सीव्हीएस व एचबीएटू या चाचण्या मोफत व सक्तीच्या व्हाव्यात.

- इलेक्ट्रो फोर्सेस व फेरिटीन तपासणी सर्व शासकीय रुग्णालयात व्हावी.

- प्रत्येक जिल्ह्यामध्ये थॅलेसिमीया, हिमोफिलिया ग्रस्त रुग्णांच्या निदान उपचाराचे स्वतंत्र केंद्र असावे.

- प्रत्येक ४ जिल्ह्यांचा समावेश असलेले एक विभागीय थॅलेसिमिया केंद्र निर्माण व्हावे.

- बोन मॅरो ट्रान्स्प्लांट साठी मॅचिंग टेस्ट व शस्त्रक्रिया मोफत कराव्यात. (Scheme)

World Thalassemia Day
Thalassemia disease : थॅलेसेमियाची ‘रुधिर-द लाईफ लाइन’

थॅलेसिमीया व इतर रक्ताच्या आनुवंशिक आजाराच्या रुग्णांच्या बाबत अनेक समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शासनाने संवेदनशीलपणे साथ दिली तर आजारी बालकांचे जीवनमान सुसह्य करता येईल. बोन मॅरो ट्रान्स्प्लांट मुळे आता रोगमुक्ती देखील दिसू लागली आहे. असे मत बरकत पन्हाळकर, संस्थापक, समवेदना फौंडेशन यांनी व्यक्त केले आहे. (Health)

तर अनेक बालकांचे बोन मॅरो मॅचींग झाले आहेत. पण बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट शस्त्रक्रियेसाठी पैसे नाहीत. म.फुले आरोग्य योजनेत रक्ताच्या आजाराच्या बालकांच्या शस्त्रक्रिया झाल्यातर मोठी मदत होणार आहे. असे मत सचिन गुळग, अध्यक्ष, समवेदना फाउंडेशन यांनी व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com