भविष्य

मेष:
प्रवास शक्‍यतो टाळावेत. वस्तू गहाळ होण्याची किंवा हरविण्याची शक्‍यता आहे. एखादी मानसिक चिंता त्रास देणार आहे. खर्च वाढणार आहेत. कामामध्ये अडचणी येतील.
वृषभ:
आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. संततिसौख्य लाभेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. भागीदारी व्यवसायात त्रास होईल.
मिथुन:
तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काहींना प्रवासाचे योग येतील. आर्थिक क्षेत्रात धाडस शक्‍यतो टाळावे. शत्रुपिडा नाही. विरोधकावर मात कराल. प्रतिष्ठा लाभेल.
कर्क:
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी, प्रसिद्धी लाभेल. थोरामोठ्यांचे चांगले मार्गदर्शन लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील. मन आनंदी व आशावादी राहणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल.
सिंह:
प्रवास शक्‍यतो टाळावेत. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आरोग्य समाधानकारक राहील. नातेवाईकांशी चांगले संबंध राहतील. व्यवसायात प्रगती होईल.
कन्या:
उत्साह वाढेल. मन आनंदी राहणार आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. थोरामोठ्यांशी परिचय होतील. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
तूळ:
व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मात्र, फार मोठे धाडस नको. कौटुंबिक जीवनात, व्यवसायात जबाबदारी वाढणार आहे. थोड्या फार कटकटींना तोंड द्यावे लागेल.
वृश्चिक:
कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. तुम्ही केलेली मागणी वरिष्ठांकडून मान्य होईल.
धनु:
एखादी अनपेक्षित चिंता निर्माण होईल. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. कामाचा ताण व दगदग वाढेल. अडचणीच्या काळात मित्र उपयोगी पडतील.
मकर:
नातेवाईकांशी मतभेदाची शक्‍यता आहे. वैवाहिक जीवनात कटकटी वाढतील. खर्च वाढणार आहेत. प्रवासात अडचणी येतील. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.
कुंभ:
उधारी, उसनवारी वसूल होईल. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. गडी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार नाही. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
मीन:
कौटुंबिक क्षेत्रात, व्यवसायात जबाबदारी वाढणार आहे. मात्र, योग्य व्यक्‍तींचे आपणाला मार्गदर्शन लाभणार आहे. अडचणीतून मार्ग निघेल. आपले निर्णय चुकीचे होत नाहीत ना याकडे लक्ष द्यावे.
रविवार, नोव्हेंबर 18, 2018 ते शनिवार, नोव्हेंबर 24, 2018
मेष:
नोकरीच्या ठिकाणी सुवार्ता ता. 20 ते 22 हे पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रातले दिवस अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उत्तमच. नोकरीच्या ठिकाणी सुवार्ता कळतील. विवाहाचा निर्णय घ्या. विशिष्ट मान-सन्मान लाभतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात स्नायुपीडेची शक्‍यता. जागरण होईल.
वृषभ:
जीवनातला बहर अनुभवाल पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात कृतिका नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातला बहर अनुभवतील. मुक्तपणे बागडा! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचा उत्सव-समारंभातून बेरंग होऊ शकतो. नातेवाइकांकडून विचित्र त्रास होण्याची शक्‍यता. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना दंतव्यथा.
मिथुन:
रागावर नियंत्रण ठेवा मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या फील्डवर नैसर्गिक पाठबळ राहणार नाही. धक्काबुक्की टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात काळजी घ्या. बाकी, शुक्रभ्रमणाचा एक टप्पा पुन्हा सुरू होत आहे. त्याचा लाभ ता. 20 ते 22 या दिवसांत होईलच. अर्थातच "धीरे धीरे चल चॉंद गगन में!'
कर्क:
"सपनों का सौदागर' भेटेल! या सप्ताहातली पौर्णिमा तुमच्या जीवनातला प्युअर सिक्वेन्स लावून देईल. यश खेचून घ्याल. ता. 20 व 22 हे दिवस प्रत्येक वन डे जिंकून देतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना "सपनों का सौदागर' भेटेल! पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती हनीमून साजरा करतील.
सिंह:
नोकरीचं बोलावणं येईल पौर्णिमेच्या आसपासच्या काळात "धकाधकीच्या मामला' असेल. स्वतःला सांभाळा. बाकी, शुक्रभ्रमणातून तरुण-तरुणींची टेलिपथी ऍक्‍टिव्ह राहील! नोकरीचं बोलावणं येईल. मघा नक्षत्राच्या व्यक्ती परदेशगमन करतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार गोंधळाचा. वस्तूंची हरवाहरवी. मोबाईल जपा.
कन्या:
अनेक शुभ घटनांचा सप्ताह सप्ताहातली नशीबवान रास! विशिष्ट प्रतीक्षा संपेल. सप्ताहाचा शेवट एकामागून एक शुभघटनांचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती गरुडझेप घेतील. मात्र, पौर्णिमेच्या आसपासच्या काळात कागदपत्रांची काळजी घ्या. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत शुभ घटनांची प्रचीती येईल. मात्र, डोक्‍याच्या दुखापती जपा.
तूळ:
सुंदर पर्व सुरू होतंय... पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुक्रभ्रमणाची एक किनार राहीलचं. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना कौटुंबिक उत्सव-समारंभांद्वारे धन्यतेचा अनुभव येईल. वैवाहिक जीवनातला एक सुंदर कालखंड सुरू होत आहे. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत लाभ. परदेशगमनाची पूर्वतयारी.
वृश्चिक:
उमेद वाढेल, विवाहस्थळं येतील पौर्णिमेच्या आसपासच्या काळात तरुणांचं "आ गले लग जा' होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना विशेष अशी फळं ही पौर्णिमा देणार आहे. उमेद वाढेल. विवाहस्थळं येतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात भौमपीडा. वाद टाळा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मनःस्तापाचा. विचित्र पाहुणे येतील.
धनु:
कोर्टप्रकरणं जपून हाताळा नैसर्गिक पाठबळं नसलेला सप्ताह. सुरक्षाव्यवस्था बळकट ठेवाच. व्यावसायिक जुगार टाळा. मंगळाची आणि गुरूची भ्रमणं नवे प्रश्‍न निर्माण करू शकतात. कोर्टप्रकरणं जपून हाताळा. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात मूळ नक्षत्राच्या व्यक्तींवर नियतीचे सर्चलाईट्‌स राहतील!
मकर:
प्रत्येक वन डे जिंकाल! पौर्णिमेच्या आसपासच्या काळात तुमची रास मैदान गाजवेल! ता. 20 ते 22 या दिवसांत प्रत्येक वन डे जिंकाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं "हौले हौले' होईल, अर्थातच एखादी "अनुष्का' भेटेल! धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवारी प्रतिकूल वातावरण राहील.
कुंभ:
कोर्टप्रकरणात यश मिळेल पौर्णिमेच्या आसपासचा काळ संमिश्र स्वरूपाचा. प्रेमप्रकरणांच्या पार्श्‍वभूमीवर हा सप्ताह काहीसा नाजूकच. नका होऊ उतावीळ. बाकी, धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक छंदांतून वा उपक्रमांतून अतिशय प्रेरक असा सप्ताह. प्रवास यशस्वी होतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणात यश. भूखंड वा वास्तू ताब्यात येईल. मात्र, भ्रातृचिंतेची शक्‍यता.
मीन:
नोकरीत काळजीपूर्वक वागा सप्ताहाची सुरवात अडखळत होईल. नोकरीत रजेवर जाण्याचे प्रसंग येतील. काळजीपूर्वक वागा. घरात उगाचच भांडणं होण्याची शक्‍यता. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता दूर होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात धकाधकीचा प्रवास करावा लागेल. सहवासातल्या स्त्रीकडून कटकट. संयम बाळगा.

ताज्या बातम्या