भविष्य

मेष:
आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. शासकीय कामात यश लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. थोरामोठ्यांचे परिचय होतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल.
वृषभ:
उत्साह व उमेद वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. संततिसौख्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. वैवाहिक जीवनात अत्यंत समाधानाचे वातावरण राहणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.
मिथुन:
महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. धाडसाने व आत्मविश्‍वासाने अडचणीवर मात कराल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कर्क:
आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. प्रवास सुखकर होतील.
सिंह:
तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. व्यवसाय वाढेल. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकाल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.
कन्या:
एखादी भाग्यकारक घटना घडेल. तीर्थयात्रा, परदेश प्रवास यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत.
तूळ:
आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. जुने येणे वसूल होईल. शत्रुपिडा नाही. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
वृश्चिक:
उत्साह, उमेद वाढेल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल.
धनु:
कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात सामान्य स्थिती राहील. सहनशिलता, सोशिकता, संयम याची आवश्‍यकता आहे. साडेसाती चालू आहे. गुरू बाराव्या स्थानात आहे.
मकर:
शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. उत्साह, उमेद वाढेल. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य लाभेल. विरोधकावर मात कराल.
कुंभ:
नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक प्रगती होत राहणार आहे. प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. मनोरंजनावर खर्च कराल.
मीन:
उत्साह, उमेद वाढेल. तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल. केटरर्स, ज्वेलर्स, साडी सेंटर, टुरिस्ट, ट्रान्स्पोर्ट या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.
रविवार, जानेवारी 13, 2019 ते शनिवार, जानेवारी 19, 2019
मेष:
कुणाचीही मस्करी करू नका आज रविवारी प्रवासात काळजी घ्या. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती रवी-हर्षल योगाच्या सीसी कॅमेऱ्याच्या निगराणीखाली राहतील. कुणाचीही मस्करी करू नका. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 17 व 18 हे दिवस सर्व बाजूंनी उत्तम क्‍लिक होणारे. आदर-सत्कार, भेटवस्तू आणि प्रेमिकांच्या गळाभेटी होतील.
वृषभ:
नोकरीत सन्मान होईल या सप्ताहात सतत चर्चेत राहणारी रास! आजचा रविवार सप्ताहाचा उत्तम ट्रॅक पकडेल. ता. 17 व 18 हे दिवस रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या संदर्भातून उसळी घेणारे. गॉडफादर भेटेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत सन्मान. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील.
मिथुन:
नातलगांशी कुचाळक्‍या नकोत मकरसंक्रांतीचा सप्ताह मानवी संबंधांतून विषारी फुत्कार टाकणारा. नातेवाइकांशी कुचाळक्‍या नकोतच. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार बेसावधपणातून घातक. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 17 व 18 हे दिवस अत्यंत प्रवाही. नोकरीतली व्यथा जाईल. सद्‌गुरूंची भेट ध्यानात किंवा प्रत्यक्षात होईल!
कर्क:
यशाचं शिखर गाठाल राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये वर्चस्व संपादन करणारी रास. तुमचा शेअर चांगलाच वधारणार आहे. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 16 ते 18 हे दिवस भन्नाट. यशाचं शिखर गाठाल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना मकरसंक्रांतीच्या आसपास एखादी गुप्त चिंता सतावेल. नका घाबरू. तिन्हीसांजेच्या वेळी काळजी घ्या.
सिंह:
नोकरीत उत्तम पर्वाचा प्रारंभ मंगळभ्रमणाचा एक अध्याय सुरू होत आहे. मकरसंक्रांतीच्या आसपासच्या काळात सावध राहा. दुष्टोत्तरं टाळा. नका घेऊ कुणाचे शिव्याशाप. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवारी नोकरीतलं उत्तम पर्व सुरू होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरीची संधी.
कन्या:
तिहेरी आचारसंहिता पाळा! मंगळभ्रमणाच्या झळा वाढू लागणार आहेत. आजचा रविवार याचीच लक्षणं दाखवेल. मकरसंक्रांतीच्या आसपासच्या काळात सावध राहा. अर्थातच मानसिक, शारीरिक, आर्थिक बाबतीत आचारसंहिता पाळा. दक्षता बाळगा. ता 17 व 18 हे दिवस शुभ ग्रहांच्या जबरदस्त साथसंगतीचे.
तूळ:
प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील मकरसंक्रांतीचा सप्ताह तुमच्या राशीला संमिश्र स्वरूपाचा. तरुणवर्गावर रोख राहील. विवाहप्रकरणं जपून हाताळा. बाकी, स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट प्रसन्न करणाऱ्या घटनांचा. धनवर्षाव. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणात यश. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय.
वृश्चिक:
कोर्टप्रकरणांत मोठं यश मकरसंक्रांतीच्या या सप्ताहात जीवनप्रवासातली काही सुंदर स्टेशनं येतील. या स्टेशनांवर थांबून जीवनाचा आनंद घ्या. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचे प्युअर सिक्वेन्स लागतील. गुरुवार अतिशय शुभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात कोर्टप्रकरणात मोठं यश मिळेल.
धनु:
तरुणांना शैक्षणिक यश हा सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना उत्तमच राहील. तरुणांना शैक्षणिक यश देणारा सप्ताह. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात शुभ ग्रहांच्या अधिकारातून लाभ होणार आहेत. ता. 17 ते 19 हे दिवस वैयक्तिक छंदांसाठी वा उपक्रमांसाठी उत्तमच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी संक्रांतीचं प्रभावक्षेत्र विचित्र फसवणुकीचं.
मकर:
फ्लॅश न्यूजमध्ये याल! या सप्ताहात तुम्ही "लष्करशहा' बनणार आहात! विशिष्ट धाडसातून फ्लॅश न्यूजमध्ये याल. शुक्रवार शुभ ग्रहांच्या अनुग्रहातून सीमापार टोलेबाजीचा. श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्रांच्या व्यक्तींना अपवादात्मक अशा पार्श्‍वभूमीवर मोठे लाभ होतील. गुरुवार गुरुभक्तांना साक्षात्कार घडवणारा!
कुंभ:
अपरिचितांशी व्यवहार नको मकरसंक्रांतीच्या आसपास ग्रहयोगांचं फील्ड जरा चमत्कारिक राहील. प्रलोभनं टाळा. अपरिचित व्यक्तींशी व्यवहार नको. बाकी, ता. 17 व 18 हे दिवस शुभ ग्रहांच्या खेळीचे. तरुणांना अद्वितीय संधी. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना कौटुंबिक पार्श्‍वभूमीवर सुखस्वास्थ्य लाभेल. वास्तुविषयक व्यवहार होतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सामाजिक बहुमान मिळेल.
मीन:
व्यावसायिकांना उभारी मिळेल प्रचंड वेग घेणारा सप्ताह. स्वतंत्र व्यावसायिकांना मकरसंक्रमण मोठी उभारी देणारं. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात गुरुवारची पुत्रदा एकादशी सुखस्वाथ्याचं पर्व सुरू करणारी. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांत यश. वादग्रस्त भूखंड सोडवाल. होतकरूंना नोकरी मिळेल.

ताज्या बातम्या