भविष्य

मेष:
काही निर्णय धाडसाने घ्याल. तुमचे प्रभावाचे क्षेत्र वाढणार आहे. थोरामोठ्यांचे अपेक्षेपेक्षा अधिक सहकार्य लाभेल.
वृषभ:
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
मिथुन:
प्रवास शक्‍यतो टाळावेत. एखादी गुप्त बातमी समजेल. प्रवासात दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे.
कर्क:
जबाबदारी वाढेल. कामाचा ताण व दगदग वाढेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना यश लाभणार आहे.
सिंह:
मित्रांची विशेष मदत लाभणार आहे. थोरामोठ्यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे.
कन्या:
तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे.
तूळ:
पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य चांगले राहणार आहे. मनोरंजनावर खर्च होणार आहे.
वृश्चिक:
महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होणार आहे.
धनु:
संततिसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍ती विशेष कामगिरी नोंदवू शकतील.
मकर:
जबाबदारी वाढेल. कामाचा ताण वाढेल. मुलामुलींच्या संदर्भातील कामे उरकून घ्यावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.
कुंभ:
वाहने काळजीपूर्वक चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
मीन:
वैवाहिक जीवनात प्रसन्नतेचे वातावरण राहील. थोरामोठ्यांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. अपेक्षित गाठी व पत्र व्यवहार होतील.
रविवार, मे 19, 2019 ते शनिवार, मे 25, 2019
मेष:
नवीन उपक्रम राबवाल या सप्ताहात अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं फील्ड फलंदाजीला अनुकूल राहील. काही नवीन उपक्रम राबवाल. काही सुंदर व्यक्ती जीवनात येतील. प्रेमिकांचं स्वप्नरंजन होईल. ता. 21 व 22 हे दिवस स्वैर फलंदाजीचे. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रवारी भावरम्यता अनुभवतील. शुक्रचांदणीचा सहवास!
वृषभ:
व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवाल कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 23 व 24 हे दिवस महत्त्वाचे. गाठी-भेटींतून भाग्यबीजं पेरली जातील. व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवाल. वादग्रस्त येणं येईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार वन डे जिंकून देणारा. प्रिय व्यक्तींबरोबर धमाल कराल.
मिथुन:
कुणालाही वचन देऊ नका फॉरवर्ड शॉर्टलेगजवळचा मंगळ तुम्हाला झेलबाद करू शकतो. कुणालाही वचन देऊ नका! बाकी, रवी-बुध सहयोगातून मृग नक्षत्राच्या व्यक्ती वैयक्तिक कौतुकसोहळे अनुभवतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 21 व 22 हे दिवस स्त्रीहट्टातून ज्वालाग्राही! पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना त्वचाविकाराची शक्‍यता.
कर्क:
आर्थिक घडी बसेल हा सप्ताह शुक्रभ्रमणातून गारवा देणारा. व्यवसायातली आर्थिक घडी पुन्हा बसेल. ता. 24 व 25 हे दिवस अतिशय प्रवाहित राहतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना आपला गेलेला फॉर्म गवसेल. मारा विजयी चौकार-षटकार! आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवार मोठ्या सुवार्तांचा. एखादा नवस फेडाल.
सिंह:
एखादी यशोगाथा लिहाल रवी-बुध सहयोगाची पार्श्‍वभूमी ग्रहांचं फील्ड फलंदाजीला अनुकूल ठेवेल. मघा नक्षत्राच्या व्यक्ती श्रीमंतांच्या यादीत जातील. जीवनाच्या रोजनिशीत एखादी यशोगाथा लिहिली जाईल. मंगळवारी नावीन्यपूर्ण शुभ फळं मिळतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी व्यावसायिक "खुल जा सिम्‌ सिम्‌'चा अनुभव येईल. नोकरीत प्रशंसा होईल.
कन्या:
गुंतवणूक फलद्रूप होईल उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी उभारी मिळेल. तरुणांना नोकरीच्या माध्यमातून परदेशगमनाची संधी. विशिष्ट गुंतवणुकी फलद्रूप होतील. सप्ताहाच्या शेवटी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक, आर्थिक कोंडी फुटेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 22 व 23 हे दिवस वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता.
तूळ:
प्रवासात काळजी घ्यावी या सप्ताहात शुक्रभ्रमणाची तेजस्विता राहील. ता. 23 व 24 हे दिवस अतिशय ऊर्जासंपन्न राहतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठा सुंदर सप्ताह. सेलिब्रिटीसारखे वागाल! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. 22 च्या संध्याकाळी प्रवासात काळजी घ्यावी. चोरी-नुकसानीची शक्‍यता.
वृश्चिक:
आहारविहारादी पथ्यं पाळा थोडं परस्परविरोधी ग्रहमान राहील. आहारविहारादी पथ्यं पाळा. बाकी, अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह व्यावसायिक प्राप्तीतून लक्षणीय असाच! थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादातून मोठी कामं होतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट सन्मान मिळतील.
धनु:
वर्तनात संयम ठेवा हा सप्ताह मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट अपवादात्मक फळं देईल. विशिष्ट जुनाट व्याधींचा भर वाढू शकतो. ता. 21 व 22 हे दिवस अशांतता वाढवतील. वागण्या-बोलण्यात संयम असू द्या. बाकी, सप्ताहाचा शेवट सुवार्तांचा. प्रसन्न राहाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थाटनाचा योग.
मकर:
अपयश धुऊन काढाल या सप्ताहात सतत प्रकाशझोतात राहाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती भूतकाळातलं अपयश धुऊन काढतील. सप्ताहाचा शेवट अद्वितीय स्वरूपाचा राहील. मुला-बाळांचा भाग्योदय होईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रवारी भावरम्य क्षण अनुभवतील.
कुंभ:
तरुणांनो, नवे छंद जोपासा हा सप्ताह रवी-बुध युतीच्या पार्श्‍वभूमीवर एक पॅकेज बहाल करेल. तरुणांनो, सप्ताहातला प्रत्येक दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा! नवे छंद वा उपक्रम राबवाच. ता. 21 व 22 हे दिवस प्रचंड उसळी घेणारे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचा अश्‍वमेध यज्ञ साजरा होईल!
मीन:
वृद्धांशी वाद टाळा हा सप्ताह मंगळाच्या दहशतीतही काही मौजमजा करेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 24 व 25 हे दिवस मोठ्या आनंदोत्सवाचे. नवपरिणितांची विशिष्ट स्वप्नं पूर्ण होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 22 मेची संध्याकाळ घरात कटकटीची. वृद्धांशी वाद टाळा. सोमवार मानसन्मानाचा. कलाकारांचा भाग्योदय.

ताज्या बातम्या