भविष्य

मेष:
काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. दानधर्माकरिता खर्च होईल. एखादी गुप्त व महत्त्वाची बातमी समजेल.
वृषभ:
कौटुंबिक सौख्य लाभेल. अनेक कामे मार्गी लागल्याचे समाधान लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मिथुन:
व्यवसायात मोठी उलाढाल होऊ शकेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरणार आहेत.
कर्क:
सर्व क्षेत्रात गतिमानतेने प्रगती होईल. विद्यार्थ्यांना सुयश मिळेल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल.
सिंह:
दानधर्माकरिता खर्च कराल. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे.
कन्या:
अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे.
तूळ:
सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीमध्ये चांगली जबाबदारी सोपवली जाईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक:
मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. शारीरिक उत्साह वाढणार आहे. कौटुंबिक जीवनात अत्यंत आनंदाचे वातावरण राहणार आहे.
धनु:
अकारण होणाऱ्या खर्चाला आळा बसेल. वैचारिक प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर:
जीवनाला एक चांगले वळण लाभेल. कोणत्या दिशेने जायचे हे समजेल. अनेकांशी सुसंवाद साधाल.
कुंभ:
महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. विरोधकावर मात कराल.
मीन:
जीवनात उत्साहाचे वातावरण राहील. महत्त्वाचे निर्णय आज घेऊन टाका. कटू बोलणे टाळावे.
रविवार, जून 23, 2019 ते शनिवार, जून 29, 2019
मेष:
आर्थिक कोंडी दूर होईल शुक्रभ्रमणाचा टप्पा कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची व्यवसायातली आर्थिक कोंडी हटवेल. कर्जमंजुरीतून लाभ. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 27 चा दिवस वाहनविरोधी. गृहिणींनी भाजण्या-कापण्यापासून काळजी घ्यावी. बाकी, संध्याकाळ सुवार्तेची. विवाहयोग. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी संध्याकाळी सखीचा सहवास.
वृषभ:
करिअरची फास्ट ट्रेन पकडाल! मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अतिशय सुंदर ग्रहमान. तरुणांना मोठा ब्रेक थ्रू मिळेल, अर्थातच करिअरची फास्ट ट्रेन मिळेल! ता. 25 व 26 हे दिवस अजब पॅकेजचे राहतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती अतिशय खुलतील. विवाहमेळाव्याला उपस्थित राहा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना कामगारपीडा.
मिथुन:
कौतुकानं भारावून जाल हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचाच. सप्ताहाची सुरवात नोकरीत रिलॅक्‍स करणारी. कौतुकानं भारावून जाल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या संधी. ता. 25 व 26 या दिवशी मुलाखती यशस्वी होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती पुत्रोत्कर्षांनं धन्य होतील. उद्याचा सोमवार प्रसन्न राहील.
कर्क:
बढतीतून बदलीचा योग राशीला आलेला मंगळ आत्मिक बळ वाढवणारा. सप्ताहात काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताह गाजवतील. तरुणवर्ग मोठा लाभ उठवेल. नोकरीच्या संधीचा लाभ घ्याच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना बढतीतून बदलीचा योग.
सिंह:
शॉर्टकट मारू नका! सप्ताहात उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना दिव्य ऊर्जा मिळणार आहे! हा सप्ताह कलाकारांना ग्लॅमर देणारा. बड्या हस्तींचा सहवास मिळेल. फेसबुकमध्ये नवा चेहरा दाखवाल! पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकींतून लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणताही शॉर्टकट मारू नये. गैरव्यवहार टाळावेत.
कन्या:
नोकरीत बढतीची चाहूल सप्ताहात शुक्रभ्रमणाची एक "फेज' राहील. तरुणांनो, चातुर्यानं लाभ घ्या. नोकरीतल्या अपवादात्मक परिस्थितीचा लाभ घ्या. बढतीची चाहूल! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्र योगाचं एक सुंदर पॅकेज राहील. वैवाहिक जीवनात उत्तम सुसंवाद राहील. मंगळवारची अष्टमी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सुवार्तांची.
तूळ:
सरकारी काम फत्ते होईल हा सप्ताह गतिशील राहील. व्यवसायात उत्तम घडामोडी घडतील. आर्थिक कोंडी फुटेल. एखादं मोठं सरकारी काम फत्ते होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्र योगाचं पॅकेज लाभेल. लावा फील्डिंग! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत फॉर्म गवसेल.
वृश्चिक:
नोकरी व सहचरी लाभेल सप्ताहात गुरू-शुक्र योगातून काही प्युअर सिक्वेन्स लागणार आहेत. प्रयत्नशील राहा. ज्येष्ठा नक्षत्राच्या तरुणांमध्ये जान येईल! नोकरी लाभेल, सहचरीही लाभेल. विवाहयोग आहेतच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 25 ची अष्टमी अतिशय यशदायी.
धनु:
जुनाट व्याधींची काळजी घ्या सप्ताहातली ग्रहांची चौकट घट्टच राहील. नवे उद्योग नकोतच! बुध आणि मंगळ यांची स्थिती आरोग्यविषयक कुरापती काढणारी! जुनाट व्याधी सांभाळा. बाकी गुरू-शुक्र योगातून विशिष्ट रसद पुरवली जाऊन पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना तग धरता येईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार लॉटरीचा.
मकर:
स्पर्धात्मक यश दिशा देईल मंगळाचं झालेलं राश्‍यांतर एक टप्पा सुरू करेल. स्वतंत्र व्यावसायिकांना विशिष्ट लाभ अपेक्षित आहेत. विशिष्ट सरकारी कामं होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या तरुणांना एखादं स्पर्धात्मक यश दिशा देईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शुभ ग्रहांच्या पॅकेजसंदर्भात उत्तमच.
कुंभ:
नवपरिणितांना स्थैर्य लाभेल पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह विशिष्ट फायनल्स जिंकून देईल. तरुणांनो, लाभ घ्याच. हा सप्ताह नवपरिणितांना जीवनात स्थैर्य देईल. सप्ताहाचा शेवट अनेक सुवार्तांचा. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती चांगलाच भाव खाऊन जातील...अर्थातच सेलिब्रिटी होतील!
मीन:
नियोजित कामं मार्गी लागतील या सप्ताहात सूर गवसेल, फॉर्म गवसेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 25 व 26 हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. नियोजित कामं फत्ते होतील. नोकरीविषयक मुलाखती यशस्वी होतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं नैराश्‍य दूर होईल. नवपरिणितांचा भाग्योदय. पर्यटनाला जाल.

ताज्या बातम्या