भविष्य

मेष:
धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. बौद्धिक क्षेत्रात तुमच्या कामगिरीची नोंद होईल. काही निर्णय धाडसाने घ्याल.
वृषभ:
महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. ग्रहांची साथ लाभणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
मिथुन:
व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहणार आहे. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील.
कर्क:
हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. ग्रह खूप अनुकूल आहेत. तुम्ही अधिक परिश्रम कराल.
सिंह:
खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणत्याही क्षेत्रात धाडस करू नका. वाहने चालवताना काळजी हवी.
कन्या:
उत्साह, उमेद वाढेल. मानसिक स्थिती उत्तम राहणार आहे. नवीन दिशा सापडेल.
तूळ:
शासकीय कामे उरकून घ्यावीत. मित्रांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्थिती कमकुवत राहणार आहे.
वृश्चिक:
महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. तुम्हाला चांगले यश लाभणार आहे. हितसंबंध निर्माण करू शकाल.
धनु:
मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहणार आहे. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश संपादन करू शकाल.
मकर:
एखादी चांगली घटना घडेल. नवीन संधी मिळेल. प्रॉपर्टीचे व्यवहार नकोत.
कुंभ:
प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. शासकीय कामे आजच उरकून घ्यावीत. व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे.
मीन:
तुमची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. सर्व क्षेत्रात चांगली संधी लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे.
रविवार, सप्टेंबर 15, 2019 ते शनिवार, सप्टेंबर 21, 2019
मेष:
व्यावसायिक लाभ होतील भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-नेपच्यून प्रतियुतीची पार्श्‍वभूमी भ्रातृचिंतेची. मात्र, ता. २० व २१ हे दिवस आनंदपर्यवसायी असतील. व्यवसायात लाभांची एक मालिकाच राहील! तरुणांच्या मुलाखती यशस्वी होतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी वाहनांपासून काळजी घ्यावी.
वृषभ:
ऑनलाईन राहा, विवाह जुळेल! मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या सुरवातीला कायदेशीर गोष्टींतून त्रास होण्याची शक्यता. मात्र, सप्ताहाचा शेवट रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना अप्रतिम असाच. प्रेमात पडाल! ऑनलाईन विवाहाची संधी. सोमवारी पुत्रचिंता दूर होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी सुवार्ता मिळेल.
मिथुन:
राहत्या जागेचा प्रश्‍न सुटेल सप्ताहाची सुरवात अतिशय शुभलक्षणी. मोठ्या व्यावसायिक लाभांचे संकेत सुखावतील. आर्द्रा नक्षत्रास सप्ताहात गाठी-भेटींतून मोठे लाभ. राहत्या जागेचा प्रश्‍न सुटेल. शुक्रवार तुमच्या राशीला अतिशय शुभ. ठोका चौकार-षटकार!
कर्क:
पूर्वसुकृत फळाला येईल! गुरुभ्रमणाची अधिसत्ता या सप्ताहावर राहीलच. ता. १५ व १६ या दिवशी मोठी कृपा होईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचं पूर्वसुकृत फळाला येईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्त चिंता जाईल. शुक्रवार मोठ्या आनंदलहरींचा. आईचे आशीर्वाद पाठीशी राहतील.
सिंह:
मित्रसहकार्यातून मोठे लाभ उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात विचित्र गाठी-भेटींची. अकारण गैरसमज होण्याची शक्यता. बाकी, सप्ताहाचा शेवट नोकरी-व्यवसायाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तम भाग्यसंकेतांचा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार ‘खुल जा सिम्‌ सिम्’‌चा अनुभव देणारा. मित्रांच्या सहकार्यातून मोठे लाभ. प्रवासात प्रीतिकथा फुलेल!
कन्या:
तरुणी प्रीतीचं फूल देईल! राशीच्या बुध-शुक्रांचा एक हंगाम राहील आणि पेरलेलं उगवेल! तरुणांना एखादी तरुणी प्रीतीचं फूल देऊन जाईल! हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहाचा आरंभ आणि शेवट जीवनातली धावसंख्या रचून देणारा. क्षणचित्रं फेसबुकवर टाकाल! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार पित्तप्रकोपाचा.
तूळ:
नोकरीत बढतीची चाहूल वाहन चालवताना आज काळजी घ्या. रस्त्यावर अजिबात वाद घालू नका. बाकी, सोमवारी नोकरी-व्यवसायातल्या सुवार्ता कळतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना बढतीची चाहूल. मॅनेजमेंटच्या ‘गुड बुक्‍स’मध्ये जाल! स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचं शुक्रवारी प्रियजनांच्या सहवासात कौतुक होईल. मोहरून जाल...सासुरवास विसराल!
वृश्चिक:
इच्छापत्राद्वारे लाभ होईल सप्ताहातली शुभसंबंधित रास. बुध-शुक्राचा फुलोरा आणि गुरुभ्रमणाचं मांगल्य प्रसन्नतेचा अनुभव देईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी पितरांचे आशीर्वाद मिळतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाच्या अखत्यारीतून काही लाभ होतील. काहींना इच्छापत्राद्वारे लाभ. पुत्रोत्कर्ष.
धनु:
वैवाहिक जीवनात कौतुक बुध-शुक्रांची षटकं अजून शिल्लक आहेतच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती धावांचा डोंगर रचतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या जल्लोषाचा. वैवाहिक जीवनात कौतुकाचा वर्षाव होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवारी नोकरीच्या मुलाखतीत यश येईल.
मकर:
नोकरीची संधी व विवाहयोगही सप्ताह गाजवणारी रास! श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती जणू अश्‍वमेध जिंकतील. ता. १६ आणि २० या दिवशी विक्रम प्रस्थापित होतील. नोकरीच्या संधींबरोबर विवाहयोगही येतील. नका करू पितृपंधरवड्याचा विचार. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना कायदेशीर बाबीत यश मिळेल.
कुंभ:
ज्वालाग्राही वस्तूंचं भान ठेवा सुरवातीस मंगळभ्रमणाची धग राहील. आजूबाजूच्या ज्वालाग्राही वस्तू आणि व्यक्तींचं भान ठेवा. ‘नो स्मोकिंग झोन’चा नियम पाळा! बाकी, शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ आणि २० हे दिवस नोकरी-व्यवसायातली वन डे जिंकून देतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वैयक्तिक सुवार्तांचा.
मीन:
‘मॅन ऑफ द मॅच’ व्हाल! शुभग्रहांच्या ‘लूज फील्डिंग’चा लाभ होईल. दुसऱ्यावर मोहनास्त्र टाकाल! अर्थातच ता. १६ आणि २० हे दिवस विवाहयोगाचे आणि व्यवसायाच्या उत्तम मार्केटिंगचे! नोकरीच्या मुलाखतींना यश मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती शेवटी ‘मॅन ऑफ द मॅच’ होतील.

ताज्या बातम्या