भविष्य

मेष:
आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
वृषभ:
वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. मुलामुलींच्या संदर्भात एखादी समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
मिथुन:
आर्थिक क्षेत्रात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. जबाबदारीत वाढ होणार आहे.
कर्क:
आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात संधी मिळेल.
सिंह:
सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कन्या:
आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.
तूळ:
व्यवसायात अडचणी जाणवतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक:
वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
धनु:
मनोरंजनावर खर्च वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
मकर:
संततिसौख्य लाभेल. कर्तृत्त्वाला संधी मिळेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ:
प्रगती वेगाने होणार आहे. हाती घेतलेली कामे मार्गी लागणार आहेत. पुढील काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.
मीन:
नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण जाणवणार आहे.
रविवार, नोव्हेंबर 10, 2019 ते शनिवार, नोव्हेंबर 16, 2019
मेष:
पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र तुमच्या राशीला नावीन्यपूर्ण फळं देईल. रवी-बुध युतियोगाच्या पार्श्‍वभूमीवर भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात मानसन्मान मिळेल, अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना याच काळात स्पर्धात्मक यशाची प्राप्ती होईल. विशिष्ट नोकरीचा लाभ. सरकारी कामं मार्गी लागतील. गुरुवार अचानक धनलाभाचा.
वृषभ:
हा सप्ताह कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर खराबच. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र अनपेक्षित घटनांमुळे धावपळीचं. मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल. बाकी, रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार अतिशय शुभलक्षणी. विशिष्ट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठा लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वैयक्तिक समारंभाचा.
मिथुन:
सप्ताह गाजवणारी रास. तरुणांना रवी-बुध युतियोगातून उत्तम लाभ. नोकरीच्या संधी येतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांमुळे सतत फ्लॅश न्यूजमध्ये राहतील. ता. १२ रोजी येणाऱ्या पौर्णिमेचा ग्रहांचा पट ऐतिहासिक शुभ फळं देईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग आहे.
कर्क:
ग्रहांचा पट शुक्रकलांच्या प्रकाशात झगमगाटी यश साजरं करेल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात जीवनातले विजयी चौकार-षटकार मारतील. नोकरीतले, व्यवसायातले प्रश्‍न सुटतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार अतिशय शुभलक्षणी.
सिंह:
सप्ताहातलं पौर्णिमेचं पॅकेज अतिशय शुभ. रवी-बुध युतियोगाची पार्श्‍वभूमी जीवनातले प्युअर सिक्वेन्स लावणारी. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती यश खेचून आणतील. सप्ताहाचा शेवटी मघा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा मानमरातब मिळेल. उच्च शिक्षणाच्या संधी.
कन्या:
सप्ताहात रवी-बुध सहयोग मोठा परिणाम साधेल. व्यावसायिक प्राप्तीत मोठी वाढ होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत भाग्योदयाच्या संधी येतील. पगारवाढ होईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार सुवार्तांचा. नूतन वास्तुप्रवेश होईल. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय.
तूळ:
सप्ताहाची सुरवात पौर्णिमेच्या फील्डवर तरुणांना उत्तमच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा धनलाभ. कलाकारांचा भाग्योदय. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी नावीन्यपूर्ण शुभ फळं मिळतील. नोकरीतल्या विशिष्ट घडामोडींमुळे बढतीचा मार्ग मोकळा होईल.
वृश्चिक:
राशीतल्या शुक्रभ्रमणातून दिवाळी चांगलीच रेंगाळेल. सप्ताहाची सुरवात मंगलमय सुरांची. नवे व्यावसायिक पर्याय उपलब्ध होतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात सुवार्ता मिळतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रभ्रमणाचा फायदा घेत बाजी मारतील.
धनु:
हा सप्ताह चंद्र-शुक्रकलांचा उत्कर्ष करणारा. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रातला रवी-बुध युतियोग लाभदायक. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं ग्रासकोर्ट राहील, अर्थातच सतत ग्रीन सिग्नल मिळेल. विवाह उरकून घ्या! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टी चतुर्थी गुरुकृपेची.
मकर:
पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र शुभग्रहांना उत्तम साथ देईल. फायदा करून घ्याच. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. वादग्रस्त खटली मिटतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार अतिशय शुभलक्षणी.
कुंभ:
मंगळवारच्या कार्तिकी पौर्णिमेचं मोठं भरतं राहील. अद्वितीय अशा रवी-बुध युतीचा प्रभाव राहील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती मोठा लाभ उठवतील. शिक्षणाच्या अंतिम टप्प्यात मोठं यश मिळेल. या सप्ताहाचा शेवट व्यावसायिक मोठ्या धनवर्षावाचा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान.
मीन:
सप्ताहातली पौर्णिमा शुभग्रहांना मोठं बळ देईल. व्यावसायिकांचं नैराश्‍य जाईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती कौटुंबिक सुवार्तांद्वारे धन्यता अनुभवतील. घरातल्या तरुणांचे प्रश्‍न सुटतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस भन्नाटच!

ताज्या बातम्या