भविष्य

मेष:
कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ:
तुमच्यावर एखादी जबाबदारी येवून पडण्याची शक्‍यता आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधा.
मिथुन:
विरोधकांवर मात कराल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कर्क:
मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. नवीन परिचय होतील.
सिंह:
दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.
कन्या:
अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. जिद्द व चिकाटी वाढेल.
तूळ:
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
वृश्चिक:
आरोग्य उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
धनु:
शत्रुपिडा नाही. कामाचा ताण व दगदग जाणवेल.
मकर:
नवीन परिचय होतील. संततीसौख्य लाभेल.
कुंभ:
प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मीन:
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
Sunday, February 28, 2021 to Saturday, March 6, 2021
मेष:
नोकरीत बढतीची चाहूल मेष : गुरू-बुध सहयोगाचं फील्ड ता. दोन व तीन हे दिवस मोठे सुंदर. तरुणांनो, मारा चौकार-षटकार. मुलाखती द्याच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीची चाहूल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ऑनलाइन विवाहस्थळं क्‍लिक होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार भाग्यसूचक.
वृषभ:
विवाहयोगाची शक्यता वृषभ : मृग नक्षत्रांच्या व्यक्तींना बुध-गुरू शुभ योगाचं एक पॅकेज राहील. ता. पाचचा दिवस मोठा शुभ. नोकरीच्या मोठ्या संधी. व्यावसायिक वादग्रस्तता सुटेल. कृत्तिका नक्षत्रांच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरुवात विशिष्ट गुप्तचिंता घालवणारी. रोहिणी नक्षत्राच्या मंडळींना विवाहयोग.
मिथुन:
जुन्या गुंतवणुकीतून मिथुन : सप्ताहातील गुरू-बुध सहयोग ता. दोनचा अंगारकीचा चंद्रोदय भाग्योदयातून साजरा करेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुप्तधनाचा लाभ शक्य! जुन्या गुंतवणुकींतून लाभ. थोरामोठ्यांच्या मध्यस्थींतून भाग्य उलगडेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. दोन व तीन हे दिवस मोठ्या कनेक्‍टिव्हिटीचे. परदेशात भाग्योदय.
कर्क:
नोकरी व्यवसायात उत्तम पर्याय कर्क : सप्ताहातील राशींच्या एक्‍स्चेंजमधील लाभसंपन्न रास. जनसंपर्कातून मोठे लाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह सतत ग्रीन सिग्नल देणारा. ता. दोन ते चार हे दिवस आत्यंतिक प्रवाही. विशिष्ट नोकरी-व्यावसायिक उत्तम पर्याय पुढे येतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाचचा दिवस मोठ्या सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवेल. भाजणं-कापणं जपा.
सिंह:
वरिष्ठांची मर्जी राखा सिंह : सप्ताहात घरातील वाद टाळा. नोकरीत वरिष्ठांची मनं सांभाळा. बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना उभारी देणारा. ता. दोन ते चार हे दिवस पूर्वा नक्षत्राच्या तरुणांना नोकरीच्या मुलाखतींतून यश देणारा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. दोनचा अंगारकीचा चंद्रोदय मोठा भाग्यसूचक. विशिष्ट सन्मान.
कन्या:
नोकरीतला प्रोजेक्ट पूर्ण होईल कन्या : सप्ताहाची सुरुवात गुरूबळातून होईल. सप्ताहात महत्त्वाच्या कामांत हात घाला. सप्ताहातील बुध-गुरू सहयोगाची पार्श्‍वभूमी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट शुभारंभ करून देईल. नोकरीतील एखादं प्रोजेक्‍ट पूर्ण कराल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे ता. दोन आणि पाच हे दिवस पतप्रतिष्ठा वाढवणारे.
तूळ:
शैक्षणिक यश व नोकरीत सुवार्ता तूळ : सप्ताह गुरू-बुध सहयोगाच्या पार्श्‍वभूमीवर तरुणांना उत्तमच. थोरामोठ्यांच्या सहकार्यातून मोठी कामे. ता. दोन ते पाच हे दिवस गाठीभेटी, करारमदार व मुलाखतींतून साध्य करणारे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती लाभ करून घेतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना अंगारकीचा दिवस शैक्षणिक यशाचा. नोकरीत सुवार्तेचा.
वृश्चिक:
बॅंकेची कामे होतील वृश्‍चिक : आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. व्यावसायिक उलाढाली होतील. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अंगारकी चतुर्थी पुत्रोत्कर्षाच्या वार्ता देईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाचचा दिवस अतिशय शुभलक्षणी. बॅंकेची कामे. काहींची कर्जवसुली.
धनु:
सार्वजनिक प्रश्‍न सोडवाल धनू : सप्ताह राश्‍याधिपती गुरूच्या विशिष्ट अवस्थेतून आपणास मोठा धीर देणाराच. विशिष्ट सामाजिक किंवा सार्वजनिक प्रश्‍न सोडवाल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीचा लाभ. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी दुर्मिळ विवाहयोग. सप्ताहाचा शेवट मंगळभ्रमणातून ओरखडे काढणारा. ठेचा लागतील. घरातील लहान मुलं जपा.
मकर:
मोठ्या भाग्योदयाची चाहूल मकर : सप्ताहात साडेसाती विसराल. आजूबाजूस मंगलवाद्ये वाजतील. आजचा रविवार तरुणांना सुखस्वप्नांत ठेवेल. अर्थात मोठ्या भाग्योदयाची चाहूल लागेल. श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. दोन ते चार हे दिवस चढत्या क्रमाने शुभ आणि सुसंगत. विशिष्ट कोर्टप्रकरण जिंकाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना धनप्राप्ती.
कुंभ:
असंगाशी संग टाळा कुंभ : मंगळभ्रमणातून मानसिक किंवा शारीरिक ओरखडे बसू शकतात. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी असंगाशी संग टाळावा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. पाच व सहा हे दिवस थोरामोठ्यांच्या गाठीभेटींचे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात पुत्रचिंता जाऊन धन्यता वाटेल. कलाकारांना लाभ.
मीन:
व्यवसायात यश मीन : सप्ताहात राश्‍याधिपती गुरू ग्रहयोगांतून पडद्यामागचा सूत्रधार राहील. सहजगत्या मोठी कामे. व्यावसायिक हालचाली यशस्वी होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. दोनची अंगारकी तपपूर्तीची. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नवपरिणितांचे भाग्योदय.

Tajya Batmya