

Budh Mahadasha 17 years effects:
Sakal
Budh Mahadasha rashifal in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, विवेक, तर्क, संवाद कौशल्य, व्यवसाय, आर्थिक विचार आणि मैत्रीचे प्रतीक मानले जाते. बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध कन्या राशीत उच्च आणि मीन राशीत दुर्बल मानला जातो. बुधाची महादशा एकूण 17 वर्षे टिकते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध शुभ स्थितीत असेल तर त्याला जीवनात, विशेषतः व्यवसाय आणि करिअरच्या क्षेत्रात अनेक सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतात.