Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य ( ०७ ऑक्टोबर २०२३ ते १३ ऑक्टोबर २०२३)

Weekly Horoscope
Weekly Horoscopeesakal
Updated on

अनिता केळकर

मेष

या सप्ताहात नेहमीच्या मार्गाचा अवलंब न करता थोडासा वेगळा मार्ग अवलंबून पाहाल. व्यवसायात, कामात अनपेक्षित कलाटणी मिळाल्याने थोडा ताण जाणवेल. काही महत्त्वाचे निर्णय घेणे भाग पडेल. नोकरीत आवश्यकतेनुसार कामात बदल कराल. कामात कार्यतत्पर राहाल. घरात महिलांनी हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे.

वृषभ

चाकोरीबाहेर जाऊन काही नवीन करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. कामात इतर व्यक्तींकडून अपेक्षा ठेवल्यास अपेक्षाभंग होईल. व्यवसायात, कामात आवश्यकतेनुसार फेरफार कराल. बदलत्या वातावरणानुसार तुमची ध्येयधोरणे ठरवाल. नोकरीत वरिष्ठ कामाचा बोजा वाढवतील. आवडत्या व्यक्तींची भेट होईल.

Weekly Horoscope
Breakfast Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी मिक्स्ड व्हेज पराठा, ही आहे सोपी रेसिपी

मिथुन

या सप्ताहात रेंगाळलेल्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. त्यात तुमचा बराच वेळ व पैसे खर्च होतील. व्यवसायात, कामात सप्ताहअखेर मनाप्रमाणे गती येईल. आर्थिक व्यवहारात मात्र काटेकोर राहा. नोकरीत स्वतःच्या कामाकडे जास्त लक्ष दिलेत तर तुम्ही तुमचे काम व्यवस्थित पार पाडू शकाल व कमी श्रमात जास्त यश मिळवाल.

कर्क

सध्या महत्त्वाच्या ग्रहांची मर्जी तुमच्यावर नाही, त्यामुळे ज्या कामांची पूर्तता करायला जाता त्याच कामांना विलंब होतो. तरी तुर्तास शांत राहा. धंदा, व्यवसायात पैशाची चणचण भासेल. परंतु हितचिंतकांची मदत होईल. जुनी येणी वसूल करण्यावर लक्ष केंद्रित करा. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा. मनाविरुद्ध काम करावे लागले तरी रागावू नका. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवा.

Weekly Horoscope
Spiritual Tips : अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे परमेश्वर भक्ती...

सिंह

घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे तुमची तारांबळ होईल. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कामांना प्राधान्य द्या. रेंगाळलेल्या कामांना प्राधान्य देऊन ती संपवण्याचा प्रयत्न करा. पूर्वी केलेल्या कामाचे आर्थिक स्वरूपात फळ मिळेल. नोकरीत कामाचा दर्जा उंचावेल. नवीन प्रशिक्षण व कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील.

कन्या

‘स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ ही म्हण या सप्ताहात लागू पडेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नवीन करारमदार करण्यास अनुकूल वातावरण राहील. कामांना वेग येईल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत सहकारी व वरिष्ठ कामात मदत करतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी योग्य कालावधी आहे. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल.

Weekly Horoscope
Sanatan Dharma Explained: सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे का?

तूळ

कामाबरोबर जीवनाचा आनंदही उपभोगण्याचा मोह तुम्हाला होईल. कामाच्यावेळी काम करून इतर वेळी आराम कराल. व्यवसायात कामे लवकर संपवाल. कामाच्या पद्धतीत बदल करून व आधुनिकीकरण करून उलाढाल वाढवाल. खर्चाचे प्रमाणही वाढेल, परंतु खर्च करताना व्यवहारी दृष्टिकोन सांभाळा.

वृश्‍चिक

ग्रहांची साथ लाभल्याने पैशामुळे थांबलेल्या कामांना आता वेग येईल. आर्थिक स्थिती सुधारल्याने तुमच्यातील आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळवू शकाल. जागा बदल, नवीन वास्तू खरेदीचे बेत मनात येतील परंतु थोडा धीर धरा. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल.

Weekly Horoscope
Ambedkar Jayanti 2024 : डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म का स्वीकारला?

धनू

कामात आलेली मरगळ दूर करून नवीन उत्साहाने कामाला लागाल. नवीन आशावाद जागृत होईल. परिस्थितीशी समझोता करून कामांना दिशा द्याल. व्यवसायात कामात तुमचा दृष्टिकोन सावध राहील. त्यामुळे कुठलीही जोखीम न घेता कामे हाती घ्याल. नोकरीत कामात सजग राहाल. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे हितावह ठरेल.

मकर

सतत पुढचा विचार आणि भविष्याची तरतूद करून मगच खर्च करता, त्याचा लाभ होईल. व्यवसायात नवीन योजना तुम्हाला प्रेरित करतील. एखादे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कृती कराल. स्वप्न व सत्य यांचा ताळमेळ घालावा लागेल. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मान्य करून घ्याल. कामाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्यात बदल कराल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ

तत्त्वांना मुरड घालून कामात लवचिकता आणलीत तर बरेच काही मिळवू शकाल. कामात बाजी माराल. व्यवसायात तुमच्या प्रगतीचा वेग वाखाणण्याजोगा असेल. बाजारातील चढउतारांचा अभ्यास नीट असेल तर सतर्क राहून फायदा उठवता येईल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामापुढे सर्व फिके वाटेल. कामाचा आनंद मिळेल. घरात दिलेला शब्द पाळून इतरांना खूश कराल. गृहसौख्य उपभोगाल.

मीन

कामात नवीन बदल करून उलाढाल वाढवण्याची व नवीन काहीतरी करण्याची तुमची मनीषा सफल होईल. व्यवसायात प्रगती उंचावण्याचा चंग बांधाल. त्यासाठी पडेल ते श्रम घेण्याची तुमची तयारी असेल. खेळत्या भांडवलाची तरतूदही होईल. नोकरीत नवीन संधीसाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. बेरोजगार व्यक्तींना कामधंदा मिळेल. जोडधंद्यातून लाभ होईल. घरात पाहुण्यांची ये-जा राहील.

Weekly Horoscope
Hindu Beliefs About Cats : इतर प्राण्यांपेक्षा मांजरीविषयीच का असतात शुभ-अशुभ संकेत? शास्त्र सांगते...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com