Hindu Beliefs About Cats : इतर प्राण्यांपेक्षा मांजरीविषयीच का असतात शुभ-अशुभ संकेत? शास्त्र सांगते...

मांजरींविषयी भारतीय समाजात अनेक शुभ-अशुभ समज आहेत.
Hindu Beliefs About Cats
Hindu Beliefs About Catsesakal
Updated on

Astrology Cat Good Or Bad Luck Superstitions, Myths And Facts In Marathi :

लोक घरात कुत्रा, मांजर, पक्षी, कासव, गाय, म्हशी असे अनेक प्राणी पक्षी पाळतात. इतरा प्राण्यांबद्दल वास्तूशास्त्रात किंवा ज्योतिषशास्त्रात फार काही शुभ-अशुभ संकेत दिले जात नाहीत. मात्र मांजर हा असा पाळीव प्राणी आहे ज्याविषयी भारतीय समाजात अनेक समज गैरसमज बघायला मिळतात.

सुरुवातच होते ती, एखाद्या कामाला निघाल्यावर वाटेत मांजर आडवं गेलं तर अशुभ संकेत होतो असं मानलं जातं. अगदी मांजराच्या रंगावरूनही हे संकेत ठरवले जातात. पण यात कितपत तथ्य आहे, शास्त्र काय सांगते जाणून घेऊया.

मांजरीच्या रंगावरून

कोणत्या रंगाची मांजर घरात आली तर शुभ आणि कोणत्या रंगाचं अशुभ असतं याविषयीही काही मान्यता आहेत. घरात जर पांढरी मांजर आली तर तो शुभ संकेत होतो असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. पांढऱ्या रंगाचं मांजर घरात आल्यामुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि नकारात्मकता बाहेर निघून जाते असं मानण्यात येतं. शिवाय पांढरी मांजर घरात आल्याने न होणारे कामही सहज होते. तर काळ्या रंगाचं मांजर अशुभ मानलं जातं. ते नकारात्मकतेचं प्रतिक समजलं जातं.

Hindu Beliefs About Cats
Superstition Vs. Science : डोळे फडफडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगते विज्ञान...

मांजरी विषयीचे शुभ-अशुभ संकेत

  • घरात जर मांजरीने पिल्लं जन्माला घातली तर ते शुभ संकेत सांगण्यात आले आहेत.

  • असं म्हणतात घरात मांजरीचे पिल्लं जन्माला आल्याने आर्थिक स्थिती सुधारते.

  • घरात शुभकार्ये घडतात.

  • घरात किंवा बाहेर मांजरांचे रडणे फार वाईट संकेत सजला जातो.

  • हा अशुभ गोष्टी घडण्याचा संकेत समजला जातो.

  • घरातील मांजर मरणे किंवा मांजरीला मारणे हे अशुभ संकेत आहेत.

  • यामुळे घरावर मोठं संकट येतं असं मानलं जातं.

  • घरात किंवा बाहेर मांजरींचं भांडणे म्हणजे घरात कटकटी सुरू होणार असं मानलं जातं.

Hindu Beliefs About Cats
Superstition : मांजर आडवी जाणं फक्त अंधविश्‍वासच नाही तर त्यामागे आहे हे कारण

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com