साप्ताहिक राशिभविष्य (२६ जून २०२२ ते ०२ जुलै २०२२) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य (२६ जून २०२२ ते ०२ जुलै २०२२)

व्यावसायिकांना चांगला कालखंड

मेष : आजचा चंद्र-शुक्र युतियोग व्यावसायिकांना सप्ताहाचे शुभ लक्षणच दाखवेल. ता. २६ व २७ हे दिवस विशिष्ट गाठीभेटी, करारमदार व घरगुती कार्याचे संकल्प करणारा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींची मरगळ जाईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र विचित्र खर्चाचे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी दुखापती जपाव्यात.

मोठ्या उलाढाली आणि सुवार्ता

वृषभ : सप्ताह मोठी मजेदार शुभ फळे देईल. सप्ताहारंभ तरुणांना अतिशय शुभलक्षणी. सहली-करमणुकी. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचे भाग्य उलगडेल. ता. ३० व १ हे दिवस मोठ्या उलाढालींचे आणि सुवार्तांचे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तूविषयक व्यवहार. नोकरीत प्रशंसा होईल.

नोकरीत परदेशगमनाचे योग

मिथुन : सप्ताह आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या मौजमजेचे योग आणेल. काहींना नोकरीतून परदेशगमन. मात्र अमावस्येजवळ मौल्यवान वस्तू जपा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या चैनीचा. नोकरीत बढतीवर बदलीचे योग. ता. ३० चा गुरुवार मोठ्या भाग्याचा. पुत्रोत्कर्ष. पती वा पत्नीचा भाग्योदय.

कौतुक सोहळ्याचा काळ

कर्क : सप्ताहातील एक भाग्यवान रास राहील. ता. २६ व २७ हे दिवस जीवनातील मोठा विजयोत्सव साजरा करतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींवर नक्षत्रलोकांतून पुष्पवृष्टी होईल. अमावस्या तीर्थाटनाची. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट वैयक्तिक कौतुक - सोहळ्याचा.

नोकरीचा लाभ, चमत्कार होतील

सिंह : सप्ताह बुध-शुक्र या ग्रहांच्या विशिष्ट तारात्मक योगातून मोठा भाग्यलक्षणी ठरेल. मित्रसंगतीतून भाग्योदय. नोकरीत वरिष्ठांच्या अनुग्रहातून लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात व्यावसायिक सतत लाभ. अमावस्या घबाड योगाचीच. ता. ३० चा गुरुवार मोठ्या चमत्कारांचा. मघा नक्षत्रास नोकरीचा लाभ.

कला - छंदातून प्रसिद्धी मिळेल

कन्या : सप्ताहातील शुभ ग्रहांचे योग आपले नोकरीतील मानांकन वाढवणारे. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचा श्रीमंतांच्या यादीत प्रवेश. ता. २६ व २७ हे दिवस अनेक प्रकारांतून सुखद धक्के देणारे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट कला, छंद वा विशिष्ट उपक्रमांतून प्रसिद्धी देणारा. अमावस्येजवळ रस्त्यावर हुज्जती टाळा.

न्यायालयीन कामात यश

तूळ : सप्ताहातील अमावस्येजवळ नकारात्मक विचार टाळा. सहवासातील स्त्रीचे रुसवे-फुगवे जपा. बाकी सप्ताहाची सुरुवात व्यावसायिकांना छानच. काहींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० व १ हे दिवस सुवार्तांतून मौजमजेचे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार कोर्टात यशाचा.

सज्जन व्यक्तींकडून मदत

वृश्‍चिक : सप्ताहाचा आरंभ बुध-शुक्राच्या खेळीचा. ता. २६ व २७ हे दिवस अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना अक्षरशः परीसस्पर्शाचे. सज्जन माणसांकडून लाभ. ता. १ जुलैचा शुक्रवार वैवाहिक जीवनात विशिष्ट विजयोत्सव साजरा करेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या पित्तप्रकोपाची. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार जागरणाचा.

व्यावसायिक प्राप्ती होईल

धनू : व्यावसायिकांना सप्ताहात शुभ ग्रहांचा उत्तम अंडरकरंट राहील. उत्सव प्रदर्शनांतून लाभ. आजचा रविवार मोठ्या व्यावसायिक प्राप्तीचा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. ता. २८ ची संध्याकाळ नवपरिणितांना घरात कलहजन्य. बाकी पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवटी घरात सुवार्तांची बहार.

प्रेमिकांचे अडथळे दूर होतील

मकर : शुक्रभ्रमण गुरूच्या लाभयोगातून होईल. तरुणांना दिलासा मिळेल. सप्ताहाची सुरुवात बेरोजगारांना नोकरी देणारी. प्रेमिकांचे अडथळे दूर होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट साडेसातीतही उत्तम रसद पुरवणारा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातील सुवार्ता. पती वा पत्नीचा भाग्योदय. मात्र अमावस्या पोटदुखीची.

ओळखी मध्यस्थीतून मोठे लाभ

कुंभ : साडेसातीच्या पार्श्‍वभूमीवरही जीवनसत्त्वांचा उत्तम पुरवठा राहील. शुक्रभ्रमण निर्णायक स्वरूपात बोलेल. प्रिय व्यक्तींची चिंता जाईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखी मध्यस्थीतून मोठे लाभ होतील. तरुणांचे शैक्षणिक प्रश्‍न सुटतील. काहींना वास्तूविषयक व्यवहारांतून लाभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ वाद टाळावेत.

चांगली नोकरी मिळेल

मीन : अमावस्येच्या सप्ताहात शुभ ग्रहांचे उत्तम संधान राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट छानच. होतकरू तरुणांची उमेद वाढेल. उद्याचा सोमवार उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या सुवार्तांतून थक्क करणारा. व्यावसायिकांना मोठे पर्याय उपलब्ध होतील. ता. १ जुलैचा शुक्रवार धनवर्षावाचा. रेवती नक्षत्रास उत्तम नोकरी मिळेल.

Web Title: Weekly Horoscope 26th June 2022 To 02th July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..