साप्ताहिक राशिभविष्य (२८ मे २०२३ ते ३ जून २०२३)

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

स्पर्धात्‍मक पातळीवर यश

मेष : भरणी नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहारंभ स्पर्धात्मक यश देणारा. परदेशी भाग्योदय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या सप्ताहात शुक्रभ्रमण चोख बोलेल. ता. २ जूनचा शुक्रवार जीवनात चांगल्या बाबी आणेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार गुरुकृपेचा तसेच पुत्रोत्कर्षातून धन्यता.

वृद्धांशी वाद घालू नका

वृषभ : सप्ताहात रवी- शनी केंद्रयोगाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता पाळावी लागेल. घरात वृद्धांशी वाद नकोत. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी आजचा शनिवार आणि शेवटी पौर्णिमेचा शनिवार क्रिया-प्रतिक्रियांतून सांभाळावा. बाकी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशेषतः पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठे लाभ. बुधवार वैयक्तिक मोठ्या सुवार्तांची. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग.

सरकारी कामांमध्ये यश

मिथुन : पौर्णिमेचा सप्ताह चंद्रकलांच्या मोठ्या उत्कर्षांचाच. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात चांगलेच होईल. प्रेमिकांच्या छान गुजगोष्टी होतील. पती वा पत्नीचा उत्कर्ष. नोकरीतील घडामोडींतून विलक्षण लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामातून यश. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र संमिश्र. खरेदी-विक्री किंवा उधार-उसनवार सांभाळा.

तरुण व कलाकारांचा भाग्योदय

कर्क : रवी-शनी केंद्रयोगाची पार्श्वभूमी आणि राशीचा मंगळ उपद्‍व्यापी मंडळींना खराबच. जुगारसदृश व्यवहार नकोतच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ आणि २ हे दिवस विचित्र खर्च वा नुकसानीचे. बाकी गुरुभ्रमण तरुणांना छानच. कलाकारांचे भाग्योदय. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचे सहकुटुंब पर्यटन.

गावगुंडांपासून सांभाळा

सिंह : सप्ताहातील मंगळभ्रमण आणि रवी- शनी केंद्रयोगाची पार्श्वभूमी मोठी उपद्रवमूल्य असलेली. नोकरीत आणि घरी अहंकारी व्यक्ती सांभाळा. विशेषतः गावगुंडापासून सांभाळा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र आचारसंहिता पाळावी लागेल. तरुणांनो मस्ती नको. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० व ३१ हे दिवस वैयक्तिक आनंदोत्सवाचे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात सन्मानाचे योग.

महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील

कन्या : चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ मोठा प्रेरक राहील. ता. ३० व ३१ हे दिवस विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण करतील. नोकरीत मोठा सन्मान मिळेल. पती वा पत्नीला नोकरी मिळेल, और क्या! उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ कोर्टात यश. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेची संध्याकाळ विचित्र भांडणाची. श्वानदंश सांभाळा.

व्यावसायिक प्राप्ती होईल

तूळ : पौर्णिमेकडे झुकणारा सप्ताह. शुक्रकलांचा उत्कर्षच करणारा. विशाखा नक्षत्राच्या तरुणांना नोकरीच्या उत्तम संधी येतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट अनेक प्रकारातून भाग्यबीजे पेरणारा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा संमिश्र स्वरूपाची फळे देईल. मौल्यवान वस्तू सांभाळा. यंत्रे, वाहने आणि धारदार वस्तू जपून हाताळा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवार व्यावसायिक प्राप्तीचा.

सार्वजनिक जीवनात त्रास

वृश्चिक : सप्ताह रवी-शनी केंद्रयोगातून सार्वजनिक जीवनातून उपद्रवाचा. स्त्रीशी गैरसमज टाळा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचे पौर्णिमेचे फील्ड सुवार्तांचे. कलाकारांचे भाग्योदय. तरुणांना विवाहस्थळे येतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा मानसन्मानाची. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० व ३१ हे दिवस व्यावसायिक वसुलीचे.

वरिष्ठांची मर्जी राहील

धनू : उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहारंभी अतिशय फॉर्ममध्ये राहतील. विशिष्ट गुंतवणुकी फलद्रूप होतील. वैवाहिक जीवनात आनंदोत्सव साजरा कराल. नोकरीत वरिष्ठांचा कृपाप्रसाद लाभेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेजवळ कायदेशीर गोष्टी सांभाळाव्यात. बाकी ता. २९ ते ३१ हे दिवस पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना भाग्यबीजे पेरणारे.

गाठीभेटी फलद्रूप होतील

मकर : शुक्राचे राश्यंतर पौर्णिमेच्या सप्ताहात तरुणांना अतिशय प्रेरक राहील. एखादी शैक्षणिक चिंता जाईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत लाभ. काहींना वास्तुयोग. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे फील्ड महत्त्वाच्या गाठीभेटीतून फलद्रूप होणारे. नोकरीत वरिष्ठ पदावरच्या मंडळींकडून लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा प्रेमप्रकरणातून वादग्रस्त वा विरोधी.

प्रवासात प्रकृती सांभाळा

कुंभ : रवी- शनी केंद्रयोगाच्या पार्श्वभूमीवर पौर्णिमेचा सप्ताह प्रदूषणाचा राहील. क्रिया-प्रतिक्रिया सांभाळा. प्रवासात प्रकृती सांभाळा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना घरगुती वादातून त्रास. तरुणांना द्वाड मित्रसंगती अडचणीत आणू शकते. बाकी सप्ताहाची सुरुवात पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक मानसन्मानातून साजरी होईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार पुत्रोत्कर्षाचा.

नोकरीतील संकटे जातील

मीन : पौर्णिमेचा सप्ताह घरगुती पार्श्वभूमीवर प्रसन्नच ठेवेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचितीचा. नोकरीतील अरिष्ट जाईल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वटपौर्णिमा प्रवासात बेरंगाची ठरू शकते. मौल्यवान वस्तू सांभाळाच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ सुवार्तांतून मोठा प्रसन्न राहील. पती वा पत्नीची चिंता जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com