वार्षिक राशिभविष्य 2024 - मिथुन : बाळगा सावधगिरी; राहा आनंददायी

राशिचक्रातील अत्यंत बुद्धिमान रास म्हणून मिथुन राशीची (Gemini Horoscope) ख्याती आहे.
Yearly Horoscope 2024 Gemini Horoscope
Yearly Horoscope 2024 Gemini Horoscope esakal
Summary

यावर्षी राशीच्या बाराव्या स्थानी गुरू आहे, त्यामुळे आपण जरा सावधगिरी बाळगणे योग्य ठरेल.

-आनंद एस. मत्तीकोप-कुलकर्णी बेळगाव.

Yearly Horoscope 2024 : राशिचक्रातील अत्यंत बुद्धिमान रास म्हणून मिथुन राशीची (Gemini Horoscope) ख्याती आहे. इतरांना बराच काळ जे समजत नाही, ते यांना पटकन समजते. शारीरिक कष्टापेक्षा बुद्धी कौशल्यावरच हे लोक अधिक वर येतात. अत्यंत बोलका, बडबडा स्वभाव, अत्यंत हुशार, वादविवादात कुणाला ऐकणार नाहीत, लिखाण आणि वाचनाची आवड, चतुरस्त्र बुद्धिमत्ता असलेली ही रास आहे.

संगीत, गायन, वादन, पत्रकारिता यावर विशेष प्रभुत्व. वात, कफ, पित्त याने त्रासणारी ही रास आहे, त्यामुळे त्यांना कोणताही रोग लवकर जडतो. अनेक कलांमध्ये हे प्रवीण असतात. त्यांच्या वागण्यात कपट नसते. यावर्षी राशीच्या बाराव्या स्थानी गुरू आहे, त्यामुळे आपण जरा सावधगिरी बाळगणे योग्य ठरेल.

जानेवारी : मकर संक्रांतीपर्यंत (Makar Sankranti) ग्रहमान अनुकूल आहे. त्याच्या आत नोकरीविषयक कामे करून घ्या. संक्रांतीनंतर काही महत्त्वाची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. मृग व पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत जपावे लागेल. राहूचे भ्रमण राजयोगकारक आहे. एखाद्या मोठ्या संस्थेत असाल, तर महत्त्वाचे एखादे पद मिळू शकते.

Yearly Horoscope 2024 Gemini Horoscope
Happy New Year 2024  :  नव्या वर्षात भाग्यवान आहेत या राशी, नशिब पालटणार अन् खिसा होणार धन-धना-धन

फेब्रुवारी : या महिन्यातील ग्रहमान जरा अडचणीचे दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत असलेली नोकरी सोडू नका. तसेच वरिष्ठवर्गाशी नमते घ्या. कामातील मंगळ, शुक्र युती खर्चात वाढ करील. तसेच पूर्वापार ओळखी वाढत जाऊन काही जणांच्या आयुष्यात प्रेमप्रकरणेही निर्माण होऊ शकतात. तर काही जणांना आपल्या कलागुणांबद्दल मोठा मानसन्मानही मिळू शकतो.

मार्च : बुध, गुरू, हर्षलच्या शुभ योगावर मोठे आर्थिक लाभ संभवतात. मंगळ, शनीचा योग अपघात, लागणे, खरचटणे, गैरसमज व अडचणी दर्शवित आहे. कोणत्याही प्रकारचे धाडस जपून करावे. तरुणाईने वाहनावरील स्टंट वगैरे करणे टाळणे अत्यावश्यक समजावे. घरात काही पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे तुमच्या आर्थिक बाबीवर ताण पडेल. त्यामुळे जराशी चिडचिड होण्याची शक्यता आहे; पण ते बाहेर दाखवू नका. कारण, येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचे घेऊन येईल.

एप्रिल : ग्रहमान सर्व बाबतीत चांगले आहे. जी कामे होणे केवळ अशक्य, तीही सहजपणे होऊन जातील. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडून महत्त्वाची कामे करून घ्या. कोर्ट प्रकरणे असतील, तर त्यात उत्तम यश मिळेल. राहू, मंगळ बाधिक योग सुरू आहे. रस्त्यावरून जाताना कोणतीही बाधित वस्तू ओलांडू नका. त्याचा पुढे त्रास होऊ शकतो.

मे : या महिन्यात बदलणारा गुरू यापुढे कितपत साथ देईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे कोणतीही कामे लक्षपूर्वक करा. गुरू, शुक्राचे भ्रमण आध्यात्मिक बाबतीत चांगले आहे. कुलाचार, देवधर्म वगैरे बाबतीत चांगले यश मिळेल. परदेश प्रवास किंवा परदेशी नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल, तर ग्रहांची उत्तम साथ मिळेल.

जून : स्वामी बुध धनस्थानी असेल. कमाईचे काहीतरी नवीन मार्ग उपलब्ध करून देईल; पण अवैध मार्गाकडे वळू नका. तुमच्या राशीतच असलेले रवी, शुक्र एखाद्या महत्त्वाच्या कामाचा प्रारंभ करून देतील. मंगळाचे भ्रमण सर्व दृष्टीने लाभदायक आहे. विशेषतः वास्तूचे कोणतेही काम वाढले असेल, तर ते या मंगळामुळे पूर्ण होईल.

जुलै : आपण कितीही प्रयत्न केले, तरी वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही, याचा या महिन्यात अनुभव येईल. जर महत्त्वाची कामे होत नसतील किंवा अडचणी येत असतील, तर कामाचे किंवा प्रयत्नांचे स्वरूप बदलावे लागेल. चारचौघांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे करा, यश मिळेल.

Yearly Horoscope 2024 Gemini Horoscope
राशीचक्रातल्या या 6 राशी असतात अध्यात्मिक, तुमची रास आहे का त्यात?

ऑगस्ट : संगणक, मशिनरी, वाहन वगैरे खरेदी करण्यासाठी उत्तम योग आहे. मंगळाचे तुमच्या राशीत होणारे आगमन लक्ष्मीदायक आहे. आगामी दीड महिन्यात बरेच धनलाभ होऊ शकतात. शुक्र-केतूचा योग चांगला नाही. अशा योगावर व्यसन वगैरे लागण्याची शक्यता असते. जरा सावध राहावे लागेल. पूर्वी काही कारणाने विस्कटलेले, महत्त्वाचे व्यवहार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने जरूर प्रयत्न करा. ऐन संकटात एखादी व्यक्ती मदतीला धावून येईल.

सप्टेंबर : रवी, केतूचे भ्रमण जागेविषयी किरकोळ समस्या निर्माण करेल. हाती घेतलेली कामे वेळेवर पूर्ण होतीलच, असे नाही. चंद्र, शुक्राच्या त्रिकोणी योगामुळे आर्थिक स्थिती मात्र भक्कम राहील. कोणत्याही व्यवहारात अडचणी येणार नाहीत. गुरू, हर्षल नको त्या ठिकाणी असल्याने कामात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी शक्यतो गुपिते राखूनच महत्त्वाची कामे हातावेगळी करावीत. कोणाच्याही प्रकरणात मध्यस्थी करणे अंगलट येऊ शकते.

ऑक्टोबर : घरात जर वास्तुदोष असेल, तर महत्त्वाची कामे अडतात. त्यासाठी घरात कुठेही काही दोष असतील, तर ते दूर करण्याचा प्रयत्न करा. तसेच जर कोणी काही मंत्रून दिलेले असेल, तर ते काढून टाका. जर काही महत्त्वाची कागदपत्रे किंवा वस्तू हरवल्या असतील, तर त्या या महिन्यात मिळू शकतात. पितृपक्षाची अमावस्या असताना दूरवरचे प्रवास व महत्त्वाच्या वाटाघाटी टाळा.

Yearly Horoscope 2024 Gemini Horoscope
Wealth Astrology: 'या' आहेत माता लक्ष्मीच्या प्रिय राशी, पैशांची कमतरता कधीच भासत नाही

नोव्हेंबर : प्रत्येकाच्या मनात काही ना काही भन्नाट कल्पना असतात. त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्याचे सोने होऊ शकते. त्याचा अनुभव या महिन्यात येईल. रवी, गुरूच्या शुभ योगावर पूर्वीचे काही वैमनस्य असेल, तर ते नष्ट होऊ शकते. शिक्षण, नोकरी व विवाह यासाठी हा महिना उत्तम आहे.

डिसेंबर : गुरू-हर्षलचा शुभ योग सुरू आहे. या काळातच कोणतीही महत्त्वाची कामे करून घ्या. कारण, हा अत्यंत शुभ असा लाभदायक योग आहे. रवी-मंगळामुळे वैवाहिक जीवनात वादावादी होऊ शकते. किरकोळ कारणावरून गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com