PHOTO - दमलेला गवा विसावलाय गवताच्या कुरणात!

कोल्हापूरकरांनो गर्दी, गोंगाट करु नका; वनविभागाचे आवाहन
PHOTO - दमलेला गवा विसावलाय गवताच्या कुरणात!
Updated on
Summary

फुलेवाडी, रिंग रोड परिसरात काल अनाहूतपणे घुसलेला गवा आज कोल्हापूर शहरात तोरस्कर चौकापर्यंत आला. गल्लीतून पुढे येण्याचा त्याला मार्ग न सापडल्याने हा गवा पुन्हा माघारी फिरला असून सध्या जामदार क्लब जवळील गवताच्या शेतात तो थांबला आहे.

फुलेवाडी, रिंग रोड परिसरात काल अनाहूतपणे घुसलेला गवा आज कोल्हापूर शहरात तोरस्कर चौकापर्यंत आला.
फुलेवाडी, रिंग रोड परिसरात काल अनाहूतपणे घुसलेला गवा आज कोल्हापूर शहरात तोरस्कर चौकापर्यंत आला.
गल्लीतून पुढे येण्याचा त्याला मार्ग न सापडल्याने हा गवा पुन्हा माघारी फिरला असून सध्या जामदार क्लब जवळील गवताच्या शेतात तो थांबला आहे.
गल्लीतून पुढे येण्याचा त्याला मार्ग न सापडल्याने हा गवा पुन्हा माघारी फिरला असून सध्या जामदार क्लब जवळील गवताच्या शेतात तो थांबला आहे.
जवळपास दोन तासांहून अधिक काळ तो येथेच थांबून आहे. लोकांची गर्दी आहे पोलिस वनविभागाचे पथक गव्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. काल दिवसभर फुलेवाडी रिंगरोड तसेच बालिंगा परिसरात हा गवा फिरत होता.
जवळपास दोन तासांहून अधिक काळ तो येथेच थांबून आहे. लोकांची गर्दी आहे पोलिस वनविभागाचे पथक गव्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. काल दिवसभर फुलेवाडी रिंगरोड तसेच बालिंगा परिसरात हा गवा फिरत होता.
लोकांनी गर्दी, आरडाओरडा केला, परिणामी गवा इकडे-तिकडे भटकत राहिला त्याची धावपळ झाली आहे त्यामुळे हा गवा पूर्ण दमला आहे.
लोकांनी गर्दी, आरडाओरडा केला, परिणामी गवा इकडे-तिकडे भटकत राहिला त्याची धावपळ झाली आहे त्यामुळे हा गवा पूर्ण दमला आहे.
रात्रभर भटकत हा गवा शहरा जवळ पोहोचला असून या क्षणाला एक गवताचे कुरण झुडपातील गारवा अशी जागा शोधून हा गवा तो बसला आहे. गवा कुरणातुन वस्तीकडे येऊ नये तसेच गर्दीमुळे त्याची धावपळ होऊ नये यासाठी वनविभागाचे पथक पोलिस अग्निशामन दल लक्ष ठेवून आहेत.

गव्याची काल दिवसभर धावपळ झाली असल्याने तो दमलेला आहे. त्यामुळे तो भयभीत होऊन इतरत्र धावपळ केल्यास धोका वाढू शकतो त्यामुळे या क्षणी त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. तो सध्या सुरक्षित जागी थांबलेला आहे. त्याला कोणताही त्रास होऊ नये यासाठी लोकांची गर्दी गोंगाट होऊ नये ही काळजी घेतली जात आहे.

- डॉ. संतोष वाळवेकर वन्यजीव संक्रमण मानद पशुवैद्यक
गव्याची काल दिवसभर धावपळ झाली असल्याने तो दमलेला आहे. त्यामुळे तो भयभीत होऊन इतरत्र धावपळ केल्यास धोका वाढू शकतो त्यामुळे या क्षणी त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. तो सध्या सुरक्षित जागी थांबलेला आहे. त्याला कोणताही त्रास होऊ नये यासाठी लोकांची गर्दी गोंगाट होऊ नये ही काळजी घेतली जात आहे. - डॉ. संतोष वाळवेकर वन्यजीव संक्रमण मानद पशुवैद्यक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com