घरी व्यायाम करायचाय, ही उपकरणे महत्वाची |Home Exercise Equipment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरी व्यायाम करण्यासाठी 'ही' उपकरणे महत्वाची

घरी व्यायाम करण्यासाठी 'ही' उपकरणे महत्वाची

कोरोना वाढल्याने जिम आणि फिटनेस क्लासेस मध्ये जायला अनेकांना भिती वाटते आहे. काही जीम तर अनिश्चित काळासाठी आहेत. त्यामुळे फिट राहण्यासाठी घरी व्यायाम (Exercise) करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. घरच्या घरी (Home) बॉडीवेट एक्सरसाइज केल्यानेही कॅलरी जाळण्यास मदत होऊ शकते. परंतु तुमचा फिटनेस जपण्यासाठी तुम्हाला तुमचा व्यायाम अधिक आव्हानात्मक करायचा असेल, तर काही मूलभूत फिटनेस उपकरणे वापरणे आवश्यक आहे.. कॉम्पॅक्ट मशिनरी आणि टूल्स तुम्हाला तुमच्या वर्कआउटमध्ये वेगळेपणा आणण्यासाठी आणि कंटाळा दूर करण्यासाठी मदत करतील. या काही उपकरणांचा वापर तुम्ही घरी व्यायामासाठी करू शकता. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी व्यायामाच्या ज्या टिप्स दिल्या आहेत त्यात या व्यायाम प्रकारांचा समावेश आहे.

बॅंड्स आणि रोप )Bands and ropes)- तुमच्या घरात भारी वजन उचलण्याची उपकरणे खरेदी करायची नसतील तर रेझिस्टन्स बँड आणि सस्पेंशन ट्रेनरचा वापर करणे योग्य आहे. हे उपकरण घरी ठेवणे सोपे आहे. यामुळे वजन उचलण्याचे काही फायदे देऊ शकतात. हा प्रकार तुमच्या स्नायूंवर ताण आणि प्रतिकार निर्माण करतात. यामुळे काही काळाने तुमचे स्नायू मजबूत होतात. कार्डिओ स्किपिंगसाठी दोरीच्या  उड्या मारमे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. यामुळे तुमची हृदय गती तसेच फुफ्फुसाची क्षमता वाढते.

वजन उचलणे (Weights)-
स्नायूंना बळकट करण्यासाठी रेझिस्टन्स बँड चांगले आहेत पण, त्याचा स्नायूंवर वजनासारखा प्रभाव पडत नाही.  शरीराला टोन करण्यासाठी वजन उचलण्यावाचून पर्याय नाही. जर तुम्ही घरी व्यायाम करण्यासाठी Weights खरेदी करणार असाल, तर मेडिसीन बॉल्स, केटलबेल आणि डंबेल यांचा विचार करा. कारण ही उपकरणे घरात कोठेही सहज ठेवता येतात. मात्र त्याआधी तुमच्या फिटनेस पातळी तपासा. त्यानंतर तुम्ही सहज उचलू शकाल, असे Weights खरेदी करा.

वजन उचलणे (Weights)- स्नायूंना बळकट करण्यासाठी रेझिस्टन्स बँड चांगले आहेत पण, त्याचा स्नायूंवर वजनासारखा प्रभाव पडत नाही. शरीराला टोन करण्यासाठी वजन उचलण्यावाचून पर्याय नाही. जर तुम्ही घरी व्यायाम करण्यासाठी Weights खरेदी करणार असाल, तर मेडिसीन बॉल्स, केटलबेल आणि डंबेल यांचा विचार करा. कारण ही उपकरणे घरात कोठेही सहज ठेवता येतात. मात्र त्याआधी तुमच्या फिटनेस पातळी तपासा. त्यानंतर तुम्ही सहज उचलू शकाल, असे Weights खरेदी करा.

व्यायामासाठी मॅट (Exercise mat)- योगासने, पिलेट्स, ध्यानधारणा आणि शरीराचे वजन असलेले काही व्यायाम यांसारख्या अनेक व्यायामांसाठी मॅट आवश्यक असते. टेगो फिट मॅट किंवा फ्लेक्सनेस्ट मॅट सारखी जाड आणि टिकाऊ मॅट वापरा. तसेच तुम्हाला वेगवेगळ्या जाडीच्या मॅट्स मिळू शकतात ज्या काही प्रमाणात आघात शोषून घेतात. तसेच तुम्हाला मउपणा मिळतो.

(इंडोर बाईक Indoor bike) -तुम्ही कार्डिओसाठी योग्य असलेले काहीशोधत असाल तर, इनडोअर बाइक घेण्याचा विचार करा.  इनडोअर बाइकिंग हा  घरात सायकलिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे . तुमच्या वर्कआउटच्या तीव्रतेवर त्याचे महत्व अवलंबून आहे. तुम्ही एका जागी स्थिर असलेली बाईक चालवून तासाला 600 पेक्षा जास्त कॅलरीज बर्न करू शकता. हा व्यायाम तुमची हृदय गती वाढवण्यास, श्वसन प्रणाली मजबूत करण्यास मदत करू शकते.

ट्रेडमिल(​Treadmill) -
घरात व्यायाम करण्यासाठी ट्रेडमिल हा लोकप्रिय उपकरण आहे. ट्रेडमिल वापरणे अतिशय सोपे आहे. तुम्ही धावणे आणि चालणे अधिक आव्हानात्मक करण्यासाठी त्याचा वेग वाढवू शकता. हे खरेदीसाठी विविध प्रकारचे ट्रेडमिल उपलब्ध आहेत,

ट्रेडमिल(​Treadmill) - घरात व्यायाम करण्यासाठी ट्रेडमिल हा लोकप्रिय उपकरण आहे. ट्रेडमिल वापरणे अतिशय सोपे आहे. तुम्ही धावणे आणि चालणे अधिक आव्हानात्मक करण्यासाठी त्याचा वेग वाढवू शकता. हे खरेदीसाठी विविध प्रकारचे ट्रेडमिल उपलब्ध आहेत,

पंचिंग बॅग (Punching bag) 
 तंदुरुस्त राहण्यासाठी पंचिंग बॅग उत्तम पर्याय आहे. पंचिंग बॅग्ज वापरल्याने तुमचे हात, छाती, पाठ आणि खांदे तसेच तुमच्या खालच्या शरीराचे पाय सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते. नियमित सरावाने तुम्ही ठोसे मारणे आणि किक मारणे सहज शिकू शकता.  हे केल्याने अनेक फायदे मिळतील.

पंचिंग बॅग (Punching bag) तंदुरुस्त राहण्यासाठी पंचिंग बॅग उत्तम पर्याय आहे. पंचिंग बॅग्ज वापरल्याने तुमचे हात, छाती, पाठ आणि खांदे तसेच तुमच्या खालच्या शरीराचे पाय सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते. नियमित सरावाने तुम्ही ठोसे मारणे आणि किक मारणे सहज शिकू शकता. हे केल्याने अनेक फायदे मिळतील.