तासाभराच्या पावसाने कशी होतो दाणादाण पहा फोटोंमध्ये

तासाभराच्या पावसाने कशी होतो दाणादाण पहा फोटोंमध्ये

नागपूर : मॉन्सूनच्या (Monsoon) प्रतीक्षेत असलेल्या उपराजधानीला मंगळवारी वादळी पावसाने जोरदार दणका (Heavy rains in Nagpur) दिला. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह बरसलेल्या पावसाने नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडविली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने आलेल्या वादळामुळे अनेक झोपड्या व घरांवरील छप्पर व टिनाची पत्रे उडून गेली. रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक चौकांमध्येही वाहतुकीची कोंडी (Traffic jams at intersections) झाली. मृग नक्षत्रातील या पहिल्याच पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. व्हेरायटी चौक, जगनाडे चौक, मेडिकल चौक, अशोक चौक, सिद्धेश्वर हॉलसमोरील मानेवाडा रोड, अयोध्यानगर पोस्ट ऑफिससमोरील रस्ता, आशीर्वादनगर, रेशीमबाग मैदानासमोरील रस्त्यासह शहरातील अनेक भागातील लहान मोठया रस्त्यांवर पाणी साचले. (फोटो - प्रतीक बारसागडे) (Trees-fell-horizontally-on-the-roads-due-to-torrential-rains)

तासाभराच्या पावसानंतर नरेंद्रनगर पुलाखाली नेहमीप्रमाणेच असे पाणी साचले होते.
तासाभराच्या पावसानंतर नरेंद्रनगर पुलाखाली नेहमीप्रमाणेच असे पाणी साचले होते. Pix_Pratik
सायंकाळी काही भागांत हलका शिडकावा झाल्यानंतर मंगळवारीही वादळी पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. रहाटे कॉलनी चौकात रस्त्यावर झाड पडल्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली होती.
सायंकाळी काही भागांत हलका शिडकावा झाल्यानंतर मंगळवारीही वादळी पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. रहाटे कॉलनी चौकात रस्त्यावर झाड पडल्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली होती. Pix_Pratik
रहाटे कॉलनी चौकात रस्त्यावर पडलेले झाड कापताना नागरिक.
रहाटे कॉलनी चौकात रस्त्यावर पडलेले झाड कापताना नागरिक.Pix_Pratik
एका पावसात झाड उन्मळून पडल्याने नागरिकांची चांगलीच कोंडी झाली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी झाडे हटविली.
एका पावसात झाड उन्मळून पडल्याने नागरिकांची चांगलीच कोंडी झाली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी झाडे हटविली.
मृग नक्षत्रातील या पहिल्याच पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. व्हेरायटी चौक, जगनाडे चौक, मेडिकल चौक, अशोक चौक, सिद्धेश्वर हॉलसमोरील मानेवाडा रोड, अयोध्यानगर पोस्ट ऑफिससमोरील रस्ता, आशीर्वादनगर, रेशीमबाग मैदानासमोरील रस्त्यासह शहरातील अनेक भागातील लहान मोठ्या रस्त्यांवर पाणी साचले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com